नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. 21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. तब्बल 28 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर उद्या दि.19 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
धडगाव वडफळ्या रोषमाळ बुद्रुक नगरपंचायतीसाठी 17 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी 79. 84 टक्के मतदान झाले होते. 17 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात आहेत. तीन पक्षांमध्ये तिरंगी लढत असून बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे 21 डिसेंबर रोजी मतदान होऊन 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती.
परंतु ओबीसी आरक्षणामुळे मतमोजणीची तारीख 22 डिसेंबरऐवजी 19 जानेवारी 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.त्यामुळे तब्बल 28 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर उद्या दि.19 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे धडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोण बाजी मारेल याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून आहे.
धडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानासाठी प्रशासन सज्ज असून 8 टेबलांवर सकाळी 10 वाजेपासुन प्रत्यक्ष मतमोजणीस सुरूवात होणार आहे. 12 वाजपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांनी दिली.








