नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळा कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी दिली आहे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे दि. 23 जानेवारी रोजी शहरातील विविध समाजातील जेष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शिवसैनिकांकडून जैय्यत तयारी करण्यात आली होती.परंतु,जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कार्यक्रम तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या कोरोना नियमावलीचे पालन करावे त्याचप्रमाणे कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी केले आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत पुढील कालावधीत कार्यक्रम घेण्यात येईल असेही जिल्हाप्रमुख मोरे यांनी सांगितले.








