Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

द. अमेरिकेतील माऊंट एकांकगुआ शिखर चढाईसाठी गिर्यारोहक अनिल वसावे याला निरोप

team by team
January 17, 2022
in राष्ट्रीय
0
द. अमेरिकेतील माऊंट एकांकगुआ शिखर चढाईसाठी गिर्यारोहक अनिल वसावे याला निरोप

नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागाच्या मिशन शौर्य अंतर्गत माऊंट एव्हरेस्ट बेस कँम्प व दक्षिण अमेरिकेतील माउंट एकांकगुआ या शिखरावर चढाईसाठी जाणारा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल मानसिंग वसावे याला आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या हस्ते शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला. आदिवासी समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच क्रीडा धोरण ठरविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून हॉकी खेळाडू व माजी सनदी अधिकारी स्व. जयपालसिंह मुंडा यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी यांनी यावेळी दिली.


आदिवासी विकास विभागाच्या वतीने ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, अपर आयुक्त महेंद्र वारभुवन आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील अनिल वसावे हा तरुण 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 22 या दरम्यान एव्हरेस्ट बेस कँपवर जाणार आहे. त्यानंतर दि. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च 2022 या कालावधीत दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच माऊंट एकांकगुआ हे शिखर सर करण्यासाठी जाणार आहे. या दोन्ही उपक्रमासाठी अनिल वसावे याला मिशन शौर्य अंतर्गत आदिवासी विभागाच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.
यावेळी श्री. पाडवी म्हणाले की, सातपुडा पर्वतरांगेत राहणारा आदिवासी समाज हा काटक असून गिर्यारोहणात अग्रेसर असतात. अनिल वसावे हा तरुणही जगातील सात खंडातील सर्वात उंच शिखरे सर करून महाराष्ट्राचे व देशाचे नाव लौकिक जगात मिळवेल. त्याच्या या ध्येयाला आदिवासी विभागाने पाठबळ द्यायचा निर्णय घेतला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या धोरणात लवकरच काही बदल करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अशा खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरण ठरविण्यात येणार असून आदिवासी युवक आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये पुढे कसे जातील यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडूंना आदिवासी समाजातील हॉकीपटू व घटना समितीच्या उपसमितीचे सदस्य जयपालसिंह मुंडा यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गिर्यारोहक श्री. वसावे यांनी आदिवासी विकास विभागाच्या मदतीबद्दल आभार मानून गिर्यारोहणाच्या माध्यमातून देशाचे व राज्याचे नावलौकिक उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त महेंद्र वारभूवन यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक आयुक्त प्रदीप देसाई यांनी स्वागत केले. प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ज्येष्ठांचा सन्मान कार्यक्रम स्थगित

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील जि. प.च्या 62 शाळा इमारती विना, एका वर्षा पासून प्रस्ताव धूळखात

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील जि. प.च्या 62 शाळा इमारती विना, एका वर्षा पासून प्रस्ताव धूळखात

नंदुरबार जिल्ह्यातील जि. प.च्या 62 शाळा इमारती विना, एका वर्षा पासून प्रस्ताव धूळखात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add