नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार
शहरातील काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते हिरालाल चौधरी तर उपाध्यक्षपदी खंडू जयराम चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.तसेच उर्वरित सर्व संचालक मंडळाची निवड देखील बिनविरोध करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगीता कोळी तसेच सहाय्यक मोहन महादू चौधरी यांनी कामकाज पाहिले. संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. यात सर्व संचालक मंडळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष हिरालाल मगनलाल चौधरी, उपाध्यक्ष खंडू जयराम चौधरी, सदस्य रमेश संभू चौधरी, दिलीप सखाराम चौधरी, डॉ. विशाल सुदाम चौधरी, रामेश्वर विष्णू दाणेज, अमृत शंकर चौधरी, पांडुरंग मदनलाल सराफ, शिरीष हिरालाल चौधरी, जितेंद्र रमेशगिरी गोसावी, रविंद्र हरी महिदे, तसेच महिला प्रतिनिधी म्हणून अनिता शिरीष चौधरी आणि सुजाता नागेश भावसार यांची निवड करण्यात आली आहे.








