नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या २८ वर्षापासून संपूर्ण भारत भरातील आदिवासी समाजातर्फे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. यावर्षी राजस्थान राज्यातील प्रतापगड येथे आदिवासी एकता सांस्कृतिक महासमेलनाचा कार्यक्रम पार पडणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतापगड येथे होणारा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
दरवर्षी आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन निमित्त जाताना अक्कलकुवा तालुक्यातील दाब येथे कनी पुजा करुन कार्यक्रमाच्या स्थळी घेऊन जाण्याची परंपरा आहे. या परंपरेत खंड पडू नये यासाठी दाब येथे कनीपूजा धरतीपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आदिवासी बांधव उपस्थित होते.








