Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील अनुप उदासी यांनी भाजपाला रामराम ठोकून शिवसेनेत केला प्रवेश

team by team
January 14, 2022
in राजकीय
0
तळोदा येथील अनुप उदासी यांनी भाजपाला रामराम ठोकून शिवसेनेत केला प्रवेश

तळोदा l प्रतिनिधी
भाजपाचे पालिकेतील गटनेते भास्कर मराठे व नगरसेविका सूनयना अनुप उदासी यांना पक्षाने निलंबनाची नोटीस बजावली असून सूनयना उदासी यांनी ही नोटस न स्वीकारल्याने चक्क त्यांच्या दरवाजावरच ही नोटीस चिटकविण्यात आली आहे.या दरम्यान भाजपाचे कार्यकर्ते व नगरसेविका तथा महिला व बालविकास सभापती सूनयना उदासी यांचे पती अनुप उदासी यांनी भाजपाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच भाजपाच्या या नोटिसमुळे तळोदा शहरात खमंग चर्चा रंगली आहे.
तळोदा नगरपालिकेच्या बुधवारी विविध विषय समित्यांची निवड घेण्यात आली होती. या निवडीत भाजपाचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्षासह तब्बल ९ नगरसेवक गैरहजर होते. त्यामुळे महत्वाची बांधकाम समिती ही विरोधकांच्या ताब्यात गेली. ही बाब पक्षाच्या चांगलीच जिव्हाळी लागली आहे. त्यामुळे पक्षाने गटनेते भास्कर मराठे व नगरसेविका सूनयना अनुप उदासी यांना निलंबनाची नोटीस
बजावली असून ती नोटीस जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी काढली आहे. या नोटीसीत म्हटले आहे की, तळोदा नगरपालिकेच्या विशेष समितीच्या निवडणुकीसंदर्भात बोलवण्यात आलेल्या बैठकीत आपण गैरहजर राहिलात व विरोधी गटाला मदत होईल अशी कृती केली शिवाय पक्षा विरोधी कारवाई केली असे नमूद करून यापूर्वीही पक्षाच्या कार्यक्रमात आपण गैरहजर राहतात तसेच पक्षाच्या ध्येयधोरणा विरोधात टीका टिप्पणी करत असतात. म्हणून या बाबत आपणास वेळोवेळी तोंडी सूचना देऊन ही आपल्या वर्तवणुकीत बदल झालेला नाही त्यामुळे पक्षविरोधी कृतीच्या अनुषंगाने आपणास पक्षातून निलंबित का करू नये याची खुलासा तीन दिवसात करावा ही नोटीस नगरसेविका सूनयना उदासी यांनी प्रत्यक्ष न स्वीकारल्याने त्यांच्या चक्क घराच्या दरवाजावर चिटकवन्यात आली आहे.
तळोदा येथील भाजपाच्या नगरसेविका सूनयना उदासी यांचे पती अनुप उदासी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत त्यांनी भाजपा सोडण्याचे पक्षांतर्गत असलेला कलह मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने याला कंटाळून त्यांनी भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश केला. अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. या दरम्यान पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीवरून झालेला भाजपा अंतर्गत झालेला मतभेद हेच पक्ष सोडण्याचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाउपप्रमुख आनंद सोनार, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, विनोद वंजारी, संजय पटेल, विपुल कुलकर्णी, विजय मराठे, जगदीश चौधरी, उदासी हे गेल्या चार महिन्यांपासून भाजपाहुन लांब राहून सेनेशी सलगी वाढवली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

अमळथे येथे विद्युत खांबावर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्याने झाल मृत्यू, मृतदेहाची झाली हेळसांड गावकरी संतप्त

Next Post

कौली गावालगत अवैध बायोडिझेल प्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

कौली गावालगत अवैध बायोडिझेल प्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add