नंदुरबार | प्रतिनिधी
पालकमंत्री ऍड. के.सी.पाडवी हे नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी विकास मंत्री झाल्या नंतर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे .परंतु जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून ज्या चांगल्या योजना राबविण्याचा निर्णय होतो,त्याचे श्रेय घेण्यासाठी म्हणून नंदुरबार लोकसभेच्या खा. डॉ. हिना गावित व आ. विजयकुमार गावित हे काम आम्हीच केले, आम्ही सातत्याने पाठपुरावा केला अशा प्रकारचे विधान नेहमीच करीत असतात असे आरोप कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यंानी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी त्यांनी यावेळी सांगीतले की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरु झालेल्या मेडिकल कॉलेजसाठी डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रयत्न केले, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही परंतु हीदेखील वस्तुस्थिती आहे की,डॉ. विजयकुमार गावित हे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना नंदुरबार येथील मेडिकल कॉलेजला एक छदाम देखील निधी आणला नाही ही वस्तुस्थिती आह.े पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये मेडिकल कॉलेजसाठी त्यांनी काहीही केले नाही.नंदुरबार लोकसभेच्या खासदार गेल्या सात वर्षापासून नंदुरबार लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत.असे असताना नंदुरबार मेडिकल कॉलेजसाठी केंद्राचा जो हिस्सा केंद्राकडून निधी आणायला पाहिजे होता तो त्या आणू शकल्या नाही ही वस्तुस्थिती आहे .कोरोनाच्या महामारीच्या कालावधीमध्ये पालकमंत्री म्हणून ऍड.के.सी.पाडवी यांनी शासनातील सर्व अधिकार्यांना वेळोवेळी सूचना करून मार्गदर्शन केले आणि योग्य नियोजन केले त्यामुळेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोरोना रोखण्या मध्ये शासन आणि प्रशासन यशस्वी झाले पालकमंत्र्यांना नंदुरबार जिल्ह्यासाठी आत्तापर्यंत ७१ रुग्णवाहिका,चार शववाहिका,दहा बाईक ऍम्बुलन्स आणि इतर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व सर्व मंत्र्यांनी सातत्याने मेडिकल कॉलेजला निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले .आणि याचाच परिपाक म्हणून दि.१५ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने शासन निर्णय घेऊन नंदुरबार येथील मेडिकल कॉलेज साठी ५३२ कोटी ४१ लाखाचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतलेला आहे .या निधीमधून १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे क्षमता असलेले रुग्णालय व इतर बांधकामे करण्यात येणार आहेत. आता े नेहमीप्रमाणेच या सर्व निधीच्या मंजुरीचे श्रेय घेण्याचे प्रयत्न खा.हिना गावित करीत आहे आहेत . श्रेयवादाची लढाई करण्यापेक्षा जिल्ह्यातील सामान्य लोकांसाठी केंद्रातून अधिकाधिक चांगल्या योजना आणण्याचं काम केल्यास जनता त्यांना धन्यवाद देईल. जिल्ह्यामधील अनेक विभागांमध्ये कोणत्याही कंपन्यांचे नेटवर्क राहात नाही त्यांच्याकडे जरी लक्ष दिले तरी त्यांनी फार मोठे काम केले असे होऊ शकेल असे प्रतिपादन आरोप कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यंानी पत्रकार परिषदेत केला.