नवापूर | प्रतिनिधी
नवापूर सिमा तपासणी नाक्यावर नवापूर पोलिसांनी २ लाख ३२ हजाराच्या गुटख्यासह ९ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
नवापूर सिमा तपासणी नाक्यावर नवापूर पोलिस स्टेशनचेपालीस पथक सिमा तपासणी नाका बेडकी येथे कर्तव्य बजावत असतांना गुजराथ राज्यातुन सोनगड येथुन स्कॉर्पीयो (क्र.एम.एच.४, बी.एन.२९२३ ) या गाडीत अवैध्यरित्या मानवी शरिरास अपायकारक असलेला विमल गुटका यांची बेकायदेशीर वाहतुक होत आहे.अशी गुप्त माहीती नवापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रविण कोळी,अशोक मोकळ यांना सिमा तपासणी नाक्यावर पाठवले असता गुजराथ राज्यातुन सोनगड येथुन काळ्या रंगाची स्कॉर्पीयो येतांना दिसली.या गाडीस उपनिरीक्षक प्रविण कोळी यांनी थांबवली व त्या वाहनाची तपासणी केली असता त्यांत बेकायदेशीर विमल गुटका २ लाख ३२ हजार व वाहनाची ७ लाख असा एकुण ९ लाख ३२ हजाराचा माल आढळुन आला वाहन व मुद्देमाल नवापूर पोलिस स्टेशन येथे आणुन पुढील कार्यवाही पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचा मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक प्रविण कोळी,अशोक मोकळ करीत आहे.यात वाहन चालक विजय पेंढारकर,सागर रामराजे यांना ताब्यात घेतले असुन तिसरा आरोपी अमित अग्रवाल अद्यापमिळुन आला नाही. तरी वरील आरोपीविरुध्द भादवी कलम ३४,१८८,२७२,२७३,३२८ सह अन सुरक्षा मानके अधिनियम चे कलम २६(२)(४) ३०(अ)(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.