म्हसावद l प्रतिनिधी
म्हसावद पोलीस स्टेशन हद्दीतील खेडदिगर ता.शहादा आंतर राज्य रस्ता शहादा खेतीया येथे तपासणी नाका लावला असून विना मास्क प्रवास करणाऱ्यांना आर्थिक दंडची कारवाई करीत आहे या वेळी 20 नागरिक/ प्रवाशांना या दंडाच्या पावत्या देण्यात आल्या.
महाराष्ट्रात कोरोनाचे सावट असताना शासन जनजागृती व दंडात्मक कारवाई करत आहे व रात्रीस संचार बंदी दिवसा जमाव बंदी अशे निर्बंध करून ही काही खट्याळ नागरिक ऐकत नसल्याने शासनास कडक पवित्रा घ्यावा लागतो त्या माध्यमातून नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सीमावर्ती भगत तपासणी नाके उभारण्यात आले असून विनामस्क प्रवास करणारे व एकत्रित गर्दी करण्यावर पोलीस प्रशासन तर्फे आर्थिक दंड ठोठावण्यात येत आहे.नागरिकांनी आपली वयक्तिक जबाबदारी समजून शासन नियमाचे काटेकोर पालन करून सामाजिक अंतर ठेवत व मास्कचा वापर करत दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याचे आव्हाहन पोलिस प्रशासन करीत आहे या वेळी खेडदिगर सिमेवर स्थित तपासणी नाक्याला म्हसावद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी अचानक भेट दिली यावेळी तपासणी नाक्यावर उपस्थित हेड कॉन्स्टेबल कलीम रावताळे, पोलीस नाईक घनश्याम सूर्यवंशी, पोलीस कॉन्टेबाल उमेश पावरा म्हसावद पोलीस स्टेशन आदी उपस्थिती होते.








