Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील दहा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल,१२ हजारचा नायलॉन मांजा जप्त

team by team
January 13, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथे पोलिसांनी जप्त केला नायलॉन मांजा एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील नायलॉन मांजा विक्रीस प्रतिबंध असतांनाही त्याची विक्री करतांना आढळलेल्या दहा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून १२ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्हालगत असलेल्या गुजरात राज्यासह संपूर्ण भारतात मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. यात अनेकजण नायलॉन मांजा वापरामुळे निसर्गातील बरेच पशु, पक्षी वेळप्रसंगी लोकांना दुखापत होवुन आपला जिवदेखील गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या पतंग उडविण्याच्या धाग्यामुळे प्राणघातक इजांपासुन पक्षी व मानव जिवितांस सरंक्षण करण्याची गरज आहे. पतंग उडवितांना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवीत हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असतांना नंदुरबार शहरासह तळोदा, धडगांव व अक्कलकुवा येथे नायलॉन मांजा विक्री करतांना मिळुन आल्याने १० जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून १२ हजार १९० रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच नायलॉन मांजाची किरकोळ विक्री किंवा प्रमुख विक्रेत्याचा शोध घेवुन त्यांचेवर पर्यावरण (सरंक्षण) अधिनियम १९८६ च्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल. त्याचप्रकारे ज्या वस्तूंपासुन पर्यावरणास हानी पोहचेल असेल असे नायलॉन मांजाची विक्री, साठवणुक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विना मास्क फिरणाऱ्या ४६४ जणांवर,१२ व्यवसायीकांविरुध्द् , रात्री दुकाने उघडे ठेवणाऱ्या ५ जणांवर गुन्हे दाखल

Next Post

‘किल्ले रायगड’नंतर आता कुलाबा किल्ल्यावरही अनधिकृत मजार; सर्व गड-किल्ले इस्लामी अतिक्रमणमुक्त व्हायलाच हवेत : हिंदु जनजागृती समिती

Next Post
‘किल्ले रायगड’नंतर आता कुलाबा किल्ल्यावरही अनधिकृत मजार; सर्व गड-किल्ले इस्लामी अतिक्रमणमुक्त व्हायलाच हवेत :  हिंदु जनजागृती समिती

'किल्ले रायगड'नंतर आता कुलाबा किल्ल्यावरही अनधिकृत मजार; सर्व गड-किल्ले इस्लामी अतिक्रमणमुक्त व्हायलाच हवेत : हिंदु जनजागृती समिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add