Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विविध विषय समिती सभापती व सदस्य निवडीप्रसंगी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह भाजपाचे ९ नगरसेवक गैरहजर

team by team
January 12, 2022
in राजकीय
0
विविध विषय समिती सभापती व सदस्य निवडीप्रसंगी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह भाजपाचे ९ नगरसेवक गैरहजर

तळोदा l प्रतिनिधी

तळोदा नगरपालिकेच्या विविध विषय समिती सभापती व सदस्य निवडीसाठी आज विशेष सभा घेण्यात आली. मात्र, सभेला सत्ताधारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह भाजपाचे ९ नगरसेवक गैरहजर होते. परिणामतः २ विषय समित्या या अवैध ठरल्यामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरु आहे.

तळोदा पालिकेच्या सभागृहात विषय समित्यांच्या निवडीसाठी आज विशेष सभेचे आयोजन सकाळी ११ वाजता पालिकेच्या सभागृहात करण्यात आले होते. सभेच्या पीठासीन अधिकारी म्हाून तहसीलदार गिरीश वखारे उपस्थित होते. भाजपाचे गटनेते भास्कर मराठे व नगरसेविका सूनयना उदासी केवळ दोनच सदस्य उपस्थित होते.पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्षसह नगरसेवक हे विषय समित्यांच्या निवडीच्या विशेष सभेला गैरहजर असल्याने नगरपालिकेच्या दोन विषय समित्या या अवैध ठरल्या.त्यामुळे दोन विषय समित्यांच्या निवडीबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे उत्सुकता लागून आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्या दृष्टिने या समित्यांची शेवटची निवड होती.तळोदा शहरात १ वर्षावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असतांना भाजपचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षा व नगरसेवक हे सभेला गैरहजर असल्याने तापलेल्या राजकीय वातावरणाला सत्ताधार्‍यांनी या सभेला गैरहजर राहून अधिकच तापवल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

पालिकेच्या सत्ताधार्‍यांमध्ये विषय समित्यांवरून सभेपुर्वीच एकमत नव्हते. सत्ताधार्‍यांना विषय समित्या या आपल्या हातातून जातील अशी भीती होतीच.त्यामुळे नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी तहसीलदार तथा पीठासन अधिकारी गिरीश वखारे यांना विषय समित्यांच्या निवडीसाठी घेण्यात येणारी विशेष सभा ही तहकूब करण्याची विनंती केली होती. परंतु तशी तरतूद नसल्याने ही मागणी तहसीलदारांनी फेटाळून लावली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार नगरपालिकेच्या विविध समितीच्या सभापतीची बिनविरोध निवड

Next Post

चरणमाळ घाटात कोंबड्यांनी भरलेला ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर पलटला, ट्रक व कोंबड्यांचे मोठे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add