नंदुरबार l प्रतिनिधी
राजस्थान राज्यातील प्रतापगढ येथे १३ ते १५ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी परिषदेचे सांस्कृतिक महासंमेलन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहे.
दि.१३ ते १५ जानेवारीदरम्यान हे महासंमेलन होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शांतता व सलोख्याचा नेहमीच अवलंब करणाऱ्या आदिवासी एकता परिषद व देशातील आदिवासीबांधवांनी शासन आदेशाचे पालन करत हे संमेलन रद्द करण्याचे जाहीर केल्याची माहिती एकता परिषदेचे महासचिव अशोक चौधरी व जिल्हा सचिव ॲड. अभिजित वसावे यांनी दिली आहे. संमेलन रद्द झाल्याने आदिवासी बांधव निराश झाले असले तरीही त्यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.








