म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद येथील देशभक्तीपर झालेला गीतांचा कार्यक्रम हा नंदुरबार जिल्ह्यात सर्वोत्कृष्ठ झाल्याचे पोलीस बॅण्ड पथकातील पोलीसांनी सांगताना त्यांचा हुंदका दाटून ऊर भरून आल्याचे मनोगतातून सांगीतले.
याबाबत वृत्त असे की, २ जानेवारी १९६१ साली महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतरित्या स्थापना झाली. पोलीस स्थापना दिवस साजरा केला जातो. ६१ व्या पोलीस स्थापना दिवसानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात सप्ताह साजरा करण्यात आला. पोलीस बॅण्ड पथकातील उच्चशिक्षित पो.हे.काॅ. भटू वाघ, अशोक वारूडे,पंकज पानपाटील,योगीराज गेजगे,आरिफ शाह,बहाद्दूर भिलाला यांचा सत्कार करण्यात आला. म्हसावद येथे पोलीस ठाण्यामार्फत जिल्हा पोलीस बॅण्ड पथकाने प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक व ऊच्च माध्यामिक विद्यालयात संचलनात देशभक्तीचे गीते बँड पथकाद्वारे केले.देशभक्तीपर गीतात पोलीस बॅण्ड पथकाने बलसागर भारत होवो,गर्जा महाराष्ट्र माझा,कदम कदम बढाए जा,ऊठा राष्ट्रवीरो सज्ज व्हा,मेरा वतन मेरा मुल्क,हिंदुस्थान हिंदुस्थान,हर करम अपना करेंगे, ऊशीर झाला बाजाराला गौळण,राष्ट्रगीत ही अखंडीत वाजवली.संगीत वाद्यातील सॅक्सोफोन, क्लारनेट,ट्रमपेट या साहित्याची ओळख भटू वाघ यांनी करून दिली. पो.काॅ.वाघ,वारूडे,गेजगे यांनी मनोगत व्यक्त केले.
या सप्ताह निमित्ताने पोलीसांना जाणून घ्या हा उपक्रम राबविला जात आहे. पोलीस व जनता संबंध अधिक घट्ट करण्याच्या प्रमुख उद्देश यामागे आहे. यात चर्चासत्र, परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे. जनतेलाही यात सहभागी करून घेण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी दिल्या आहेत. म्हसावद येथे सती गोदावरी माता विद्यालयात जिल्हा बॅण्ड पथकाने अतिशय सुमधूर संगिताने देशभक्तीपर गाणे सादर करून विद्यार्थ्यात देशभक्ती निर्माण करण्याची जनजागृती केली. सीमेवरचा जवान आणि देशांतर्गत असलेला पोलीस रस्त्यात भेटला तर त्यांना सॅल्यूट करा अशी शिकवण विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी प्राचार्या सुरेखा गुजर,सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.सुत्रसंचलन सुधाकर पाटील यांनी केले.








