Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे सती गोदावरी माता विद्यालयात नंदुरबार पोलीस बॅण्ड पथकाने सादर केला देशभक्ती गीते

team by team
January 11, 2022
in शैक्षणिक
0
म्हसावद येथे सती गोदावरी माता विद्यालयात नंदुरबार पोलीस बॅण्ड पथकाने सादर केला देशभक्ती गीते

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद  येथील देशभक्तीपर झालेला गीतांचा कार्यक्रम हा नंदुरबार जिल्ह्यात सर्वोत्कृष्ठ झाल्याचे पोलीस बॅण्ड पथकातील पोलीसांनी सांगताना त्यांचा हुंदका दाटून ऊर भरून आल्याचे मनोगतातून सांगीतले.
याबाबत वृत्त असे की, २ जानेवारी १९६१ साली महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतरित्या स्थापना झाली. पोलीस स्थापना दिवस साजरा केला जातो. ६१ व्या पोलीस स्थापना दिवसानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात सप्ताह साजरा करण्यात आला. पोलीस बॅण्ड पथकातील उच्चशिक्षित पो.हे.काॅ. भटू वाघ, अशोक वारूडे,पंकज पानपाटील,योगीराज गेजगे,आरिफ शाह,बहाद्दूर भिलाला यांचा सत्कार करण्यात आला. म्हसावद येथे पोलीस ठाण्यामार्फत जिल्हा पोलीस बॅण्ड पथकाने प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक व ऊच्च माध्यामिक विद्यालयात संचलनात देशभक्तीचे गीते बँड पथकाद्वारे केले.देशभक्तीपर गीतात पोलीस बॅण्ड पथकाने बलसागर भारत होवो,गर्जा महाराष्ट्र माझा,कदम कदम बढाए जा,ऊठा राष्ट्रवीरो सज्ज व्हा,मेरा वतन मेरा मुल्क,हिंदुस्थान हिंदुस्थान,हर करम अपना करेंगे, ऊशीर झाला बाजाराला गौळण,राष्ट्रगीत ही अखंडीत वाजवली.संगीत वाद्यातील सॅक्सोफोन, क्लारनेट,ट्रमपेट या साहित्याची ओळख भटू वाघ यांनी करून दिली. पो.काॅ.वाघ,वारूडे,गेजगे यांनी मनोगत व्यक्त केले.
या सप्ताह निमित्ताने पोलीसांना जाणून घ्या हा उपक्रम राबविला जात आहे. पोलीस व जनता संबंध अधिक घट्ट करण्याच्या प्रमुख उद्देश यामागे आहे. यात चर्चासत्र, परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे. जनतेलाही यात सहभागी करून घेण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी दिल्या आहेत. म्हसावद येथे सती गोदावरी माता विद्यालयात जिल्हा बॅण्ड पथकाने अतिशय सुमधूर संगिताने देशभक्तीपर गाणे सादर करून विद्यार्थ्यात देशभक्ती निर्माण करण्याची जनजागृती केली. सीमेवरचा जवान आणि देशांतर्गत असलेला पोलीस रस्त्यात भेटला तर त्यांना सॅल्यूट करा अशी शिकवण विद्यार्थ्यांना देण्यात आली.  यावेळी प्राचार्या सुरेखा गुजर,सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.सुत्रसंचलन सुधाकर पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

यशवंत विद्यालयातील 149 विद्यार्थ्यांचे लसीकरण

Next Post

नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय घवघवीत यश

Next Post
नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय घवघवीत यश

नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add