Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये गुणवत्ता शिक्षणासह स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, दोघा शिक्षक भाऊंचा अभिनव उपक्रम

team by team
January 11, 2022
in शैक्षणिक
0
अक्कलकुवा तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये गुणवत्ता शिक्षणासह स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, दोघा शिक्षक भाऊंचा अभिनव उपक्रम

मोलगी l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये गुणवत्ता शिक्षणासह स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्याचे शिक्षक आपसिंग वसावे व प्राध्यापक इरमा वसावे उपक्रम राबवित आहेत.

ज्या समाजात आपण जन्मलो शिकलो सवरलो त्यांचं ऋण फेडावे, व आपला अनुभव आताच्या पिढीतील विद्यार्थ्यांसमोर कथन करावा जेणेकरून त्यांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, पिलीव माळशिरस. जिल्हा सोलापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मोलगी गावचे रहिवासी वसावे आपसिंग धर्मा व त्याचे भाऊ प्राध्यापक जयसिंग इरमा वसावे जिजामाता जुनिअर कॉलेज जेजुरी, जिल्हा पुणे यांच्या सोबत कोरोना काळात आश्रम शाळेतील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे लक्षात घेता येणाऱ्या संकटांवर मात करून शिक्षण व स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शनासाठी अक्कलकुवा तालुक्यातील आश्रम शाळा मोलगी, प्रज्ञा कॉलेज मोलगी, माध्यमिक विद्यालय मोलगी, आश्रम शाळा सुरगस, शासकीय आश्रम शाळा बर्डी, शासकीय आश्रम शाळा भगदारी, शासकीय आश्रम शाळा भांग्रापाणी व शासकीय आश्रम शाळा दाब या शाळांना भेट देऊन कोरोनाचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक शाळेतील विध्यार्थांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी जोपासात जीवन म्हणजे काय? जीवन कसे जगले पाहिजे? जीवनात यशस्वी होण्याचे मुलमंत्र, जीवनात येणाऱ्या संकटावर कसे मात करावे? यशस्वी लोकांनी खुप मोठया संकटावर मात करून ते कसे यशस्वी झाले? आदिवासी विद्यार्थी अभ्यासात मागे राहण्याची कारणे, अभ्यास कसा करावा, शिक्षणाचे महत्व, फक्त शिक्षण न घेता गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षाचे महत्व, तयारी कशी करावी या सर्व विषयावर मार्गदर्शन करून त्याचा आत्मविश्वास वाढवला. सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. आदिवासी विदयार्थांनी आपल्यातील क्षमता ओळखून स्वतःला कमी न समजता येणाऱ्या संकटावर मात करून पुढे जावे. विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल असा आत्मविश्वास शिक्षक आपसिंग वसावे यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे केळी विक्रेत्याची सात लाखात फसवणूक, हरियाणाच्या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

मांडवा येथील अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व  उच्च माध्यमिक आश्रमशाळेत ९७ विद्यार्थ्यांचे झाले लसीकरण 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add