नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसुसंस्कार केंद्रातर्फे ( दिंडोरी प्रणित ) मंगलदास पार्क येथे ग्राम व नागरी अभियान प्रशिक्षण व जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी कृषीरत्न आबासाहेब मोरे मार्गदर्शन करणार आहेत.
नवापूर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसुसंस्कार केंद्रातर्फे ( दिंडोरी प्रणित ) मंगलदास पार्क येथे ग्राम व नागरी अभियान प्रशिक्षण व जागतिक कृषी महोत्सवाचे आज दि.8 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेला आयोजन करण्यात आले आहे.यात कृषीरत्न आबासाहेब मोरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत एक दिवसीय कृषीचा जनजागर करण्यात येणार आहे.
नवापुर तालुक्यातील व शहरातील सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कृषी विषयक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.कार्यक्रमासाठी सुराई गोशाळा, सुमाणिक फार्म हाऊस, नवापुर यांचे सौजन्य लाभणार आहे.
(सूचना :- कृपया कोरोना नियमांचे पालन करत कार्यक्रमास उपस्थित राहावे.)