Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरोनाची लागण होवुन मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

team by team
July 15, 2021
in शैक्षणिक
0
कोरोनाची लागण होवुन मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

नंदुरबार | प्रतिनिधी
कोविड-१९ काळात शासकीय ड्युटी करीत असतांना कोरोनाची लागण होवुन मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या कुटुंबियांना मदत मिळण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपली सामाजिक बांधिलकी जपत वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत कोरोना काळात खाली दिलेल्या जबाबदार्‍या प्रामाणिकपणे पार पाडत असतांनाजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सच्या तोंडी आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तोंडी आदेशान्वये कोविड-१९ काळात खालीलप्रमाणे शासकीय ड्युटी करणेबाबत आदेश दिले होते. क्वारंटाईन सेंटरवर नोंदणी करणे. कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्यांची यादी करणे.सदर यादीतील लोकांना कोरोना टेस्ट करुन घेण्यासाठी प्रवृत्त करणे. याद्यांमधील लोकांची माहिती पोर्टलवर भरणे आदी कामाव्यतिरिक्त इतरही अनेक कामे आरोग्य केंद्र, ग्रामसेवक तोंडी सुचना देवून शिक्षकांकडून करवून घेतात अन्यथा वरिष्ठांना नावे कळवु अशी भाषा वापरली जाते.
शिक्षकांनी आतापर्यंत त्यांना दिलेल्या जबाबदार्‍या पार पाडत असतांना आपली शाळेतील कामेही अखंडपणे चालु ठेवली आहेत. स्वाध्याय उपक्रमात नंदुरबार जिल्हा राज्यात चांगल्या स्थानी आहे. विद्यार्थ्यांना अखंडपणे अध्यापन केले आहे. कोरोनाविषयक कामांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. शेकडो शिक्षक व त्यांचे कुटूंबिय कोरोनाबाधित झाले. त्यांना उपचार मिळण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. लसीकरणासाठी देखील शिक्षकांना सर्वत्र भटकावे लागत आहे. अशा स्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांमध्ये कमालीची असुरक्षितता व नाराजीची भावना आहे. कोरोना सेवेत असणार्‍या शिक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण तात्काळ देण्यात यावे. आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात कोरोनामुळे मयत शिक्षकांच्या कुटूंबाला याचा तातडीने लाभ देण्यात यावा. कोरोना संक्रमित शिक्षकांच्या व कुटूंबातील सदस्याच्या उपचाराची हमी प्रशासनाने घ्यावी. शिक्षकांना कोरोनाविषयक कामाचे आदेश देतांना ते सक्षम अधिकार्‍यांच्या(आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संदर्भसह) सहीने व किती दिवस काम करावे याचा आदेशामध्ये उल्लेख असावा. जेणेकरुन भविष्यात शिक्षकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. एका शिक्षकास एकच काम देण्यात यावे. कारण कामाव्यतिरिक्त शालेय काम सुद्धा पार पाडणे आवश्यक होते. परंतु तोंडी आदेशाने कामे करुन घेतली. शिक्षकांना पीपीई किट, मास्क व अन्न सुरक्षा साधने प्रशासनाकडून पुरविली जावीत. कोरोना कालावधीतील काम हे कर्तव्य कालावधी समजुन सेवा पुस्तकामध्ये नोंदी घेवुन त्या कालावधीत विशेष रजा हिशोबामध्ये धरावी. इ. कामे शिक्षकांनी कोविड-१९ काळात अत्यंत जबाबदारीने पार पाडली, तरी कोविड-१९ काळात शासकीय ड्युटी करीत असतांना कोरोनाची लागण होवुन मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या कुटूंबियांना मदत मिळावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.यावेळी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, तानाजी नवगिरे, गणेश कौतीक, विश्वास देसाई, गोटू पावरा ,तुकाराम अलट आदी उपस्थीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचा असाही उपक्रम

Next Post

ग्रामपंचायतनिहाय नळ पाणी पुरवठ्याबाबत माहिती घ्या- डॉ.हिना गावीत

Next Post
ग्रामपंचायतनिहाय नळ पाणी पुरवठ्याबाबत माहिती घ्या- डॉ.हिना गावीत

ग्रामपंचायतनिहाय नळ पाणी पुरवठ्याबाबत माहिती घ्या- डॉ.हिना गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add