Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

team by team
November 28, 2026
in शैक्षणिक
0
एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

नंदूरबार l प्रतिनिधी

जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर २०२६-२७ मध्ये ‘एल निनो’ (El Niño) प्रभावामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीबाबत ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी नंदुरबार येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नळवे खुर्द ता. जि. नंदुरबार येथे प्राचार्य नुतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जनजागृती रॅली व सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

या उपक्रमात ४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शाश्वत उपाययोजना सुचवल्या.हवामान बदलाचा शेती व दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती रॅली काढली. घोषणाबाजी, फलक व संवादाच्या माध्यमातून पाणी बचत, पीक नियोजन आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याबाबत ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले.
रॅलीनंतर विद्यार्थ्यांच्या पथकाने गावातील अनुभवी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या.

या संवादातून खालील प्रमुख बाबी समोर आल्या

अनिश्चित पाऊस व पाणीटंचाई: पावसाचे बदलते वेळापत्रक आणि भूजल पातळी खालावण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पीक उत्पादनावरील परिणाम: वाढते तापमान आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा झाली.

खर्च व जोखीम

बदलत्या हवामानात कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यावर शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले.

शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शकांनी खालील उपाययोजना सुचवल्या

  पाणी साठवण व काटकसर: शेततळे, बंधारे, जलसंधारणाची कामे आणि ठिबक व तुषार सिंचनाचा प्रभावी वापर करणे.

हवामानानुकूल पीक पद्धती: कमी पाण्यात येणारी, दुष्काळ प्रतिरोधक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे.

मृदा व पर्यावरण संवर्धन:

सेंद्रिय खतांचा वापर, आच्छादन आणि वृक्षलागवडीद्वारे जमिनीतील ओलावा टिकवणे.
या उपक्रमास नळवे खुर्दच्या सरपंच सरूबाई रोशन नाईक आणि ग्रामसेवक दक्षा उत्तम बैसाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. या संपूर्ण मोहिमेत सहभागी झालेल्या ४० विद्यार्थ्यांना के. एस. गर्दे आणि रोहन पाडवी यां शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

November 28, 2026
एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

November 28, 2026
डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

November 28, 2026
उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

November 28, 2026
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

November 28, 2026
एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

November 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add