नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयात अनेक वर्षापासुन गौरक्षा व गौसेवेत कार्यरत असलेले.मागील अनेक वर्षात सनदशीर मार्गाने हजारो गौवंशाचे प्राण वाचवले असून.त्यावेळी वेळोवेळी पोलीस प्रशासनाचे सहकार्य गोरक्षकांना मिळाले मागील काही दिवसापासून गौरक्षेचे कार्य करणार्या कार्यकर्त्यांवर प्रशासनाकडुन खोटे गुन्हे दाखल करणे, हद्दपार प्रस्ताव काढणे, वेळोवेळी अपमानित करणे,धमक्या देणे, अर्वाच्च भाषेत शिविगाळ करणे तत्सम प्रकार जिल्हयात घडत आहे.गौरक्षकांवर दाखल होत असलेल्या खोटया गुन्हांची चौकशी करून गौहत्या कायदयांची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास जिल्हाभरात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा ईशारा गोरक्षक केतन रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिला
नंदुरबार येथे जिल्हा गोरक्षा समितीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पुढे श्री. रघुवंशी म्हणाले की, काही दिवसापासून गौरक्षेचे कार्य करणार्या कार्यकर्त्यांवर प्रशासनाकडुन खोटे गुन्हे दाखल करणे, हद्दपार प्रस्ताव काढणे, वेळोवेळी अपमानित करणे,धमक्या देणे, अर्वाच्च भाषेत शिविगाळ करणे तत्सम प्रकार घडत आहेत.याउलट गौहत्या व गौतस्करी करणारे आरोपी तस्करांना झुकते माप देत त्यांना बनावट पुरावे सादर करण्यासाठी जाणीवपूर्वक मुभा दिली जाते व गौतस्कारांच्या सामुहीक व संख्यात्मक दबावाला बळी पडुन चोर सोडुन सन्याशीला फाशी देण्याचा प्रकार जिल्हा पोलीस दलातील काही भ्रष्ट अधिकार्यांकडुन केला जात आहे.असा आरोप यावेळी करण्यात आला. या सततच्या खोटे गुन्हे व अपमानीत भाषेमुळे हिंदु समाजाच्या मनात सदरक्षणाय खलनिग्रहणाय|या महाराष्ट्र पोलीस सेवेच्या ब्रीदवाक्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे जिल्हयातील गौरक्षकांना जिल्हयात होणारी गौहत्या व तस्करी दिसत असून ते प्रशासनास का दिसत नाही?हा यक्ष प्रश्न हिंदु समाजाला पडला आहे.
गौरक्षक पोलीसांना वेळोवेळी माहिती देतात त्यामुळे पोलीसांना काही अंशी तस्करांवर नाईलाजास्तव कार्यवाही करणे भाग पडते त्यामुळे त्यांचे आर्थिक हितसंबंध दुखावत असल्याकारणाने आम्हा गौरक्षकांवरवरील अत्याचार वाढत असल्याचे आमचे ठाम मत असून आणि यामुळेच दि.२५ नोव्हेंबर २०२१ व २५ डिसेंबर २०२१ या दोन्ही दिवशी दाखल केलेले खोटे गुन्हे यांची चौकशी करून गुन्हे मागे घेण्यात यावे व खोटे गुन्हे दाखल करणार्या फिर्यादी व अधिकारी यांच्यावर कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी.तसेच संपुर्ण जिल्हयात गौवंश हत्या व तस्करी कायदयाची कडक अंम्मलबजावणी करण्यात यावी.
जिल्हयात पोलीस अधिकारी मार्गदर्शनाखाली स्वतंत्र्यपणे विशेष पोलीस गौरक्षक पथक कायमस्वरूपी स्थापन करण्यात यावे. गौवंश हत्या बंदी कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करून घेणेस टाळाटाळ करणार्या. नकार देणार्या पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. वरील सर्व कायदेशिर मागण्या व तक्रारीचे लवकरात लवकर निवारण न झाल्यास नंदुरबार जिल्हयात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नंदुरबार जिल्हा गौरक्षा समितीचे केतन रघुवंशी , डॉ नरेंद्र पाटील , राजू गावित , अजय कासार , ॲड.रोहन गिरासे , राजा साळी , अश्विन जयस्वाल , भूषण पाटील , अमन जव्हेरी , टायगर पावरा , संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला .








