Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेसह ‘कोविड-19’ लसीकरण जनजागृती अभियान

team by team
January 7, 2022
in आरोग्य
0
नंदुरबार जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेसह ‘कोविड-19’ लसीकरण  जनजागृती अभियान

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व पिरामल स्वास्थ्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम आणि कोविड- 19 लसीकरण’ जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
जिल्हा परिषद, नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे, जयंत पाटील, अनिल पाटील, राहुल दळवी, रामचंद्र बारी, नंदकिशोर पाटील, पिरामल स्वास्थचे जिल्हा परिवर्तन अधिकारी नीलचंद्र शेंडे, साईनाथ अरगडे, रवींद्र भोये, विजय सिसोदिया, नीलम पाडवी आदी उपस्थित होते.
या मोहिमेअंतर्गत दुर्गम भागात क्षयरोगाची लक्षणे तपासण्यासाठी प्रभावी पद्धतीने जनजागृतीपर उपक्रम राबविणे, क्षयरोग चाचणीसाठी थुंकी गोळा करणे आणि त्याचे नमुने आरोग्य यंत्रणेकडे पाठविणे. क्षयरोगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी समुदायस्तरावर उपक्रम राबविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये 100 दिवसांसाठी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेसह कोविड 19 लसीकरणाबाबत नागरिकांचे समुपदेशन, लसीकरणाबाबत अफवा, शंकांचे निरसन जनजागृतीचे काम करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गौरक्षकांवर दाखल होत असलेल्या खोटया गुन्हांची चौकशी करून गौहत्या कायदयांची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास जिल्हाभरात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा नंदुरबार जिल्हा गोरक्षा समितीचा ईशारा

Next Post

वनविभागाचे कर्मचारी दिसताच दुचाकी फेकुन एकाने ठोकली धुम,साग चौपाटसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
वनविभागाचे कर्मचारी दिसताच दुचाकी फेकुन एकाने ठोकली धुम,साग चौपाटसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त

वनविभागाचे कर्मचारी दिसताच दुचाकी फेकुन एकाने ठोकली धुम,साग चौपाटसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add