Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजीपाला विक्रेते, दुकानदार, गर्दीच्या ठिकाणाच्या व्यायसायिकांची कोरोना चाचणी प्राधान्याने करा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
January 4, 2022
in आरोग्य
0
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण यावे तसेच विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याने यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
‘कोविड-19’ पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे (शहादा), सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात गेल्या काही दिवसात बाधितांची संख्या वाढत असल्याने अशा ठिकाणी अधिक लक्ष द्यावेत. कोरोना बाधितांची संख्या असलेल्या ठिकाणांची संपर्क साखळी शोधुन बाधीत व्यक्तिंच्या निकटवर्तीयांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर भर द्यावा. बाधीत रुग्णांच्या प्रवासाच्या तपशिलाची माहिती घ्यावी. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी प्रत्येक तालुक्यातून दररोज किमान 200 स्वॅब संकलन करावेत. भाजीपाला विक्रेते, दुकानदार,सलून चालक, गर्दीच्या ठिकाणाच्या व्यायसायिकांची कोरोना चाचणी प्राधान्याने करावी.
आरोग्य यंत्रणेने कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करुन त्यामधील आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. सर्व ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड, पुरेसा औषधासाठा व वैद्यकीय साधनसामग्री, आरटीपीसीआर किट, ॲन्टीजन किटची मागणी आदींचे आतापासूनच नियोजन करावे. ऑक्सिजन पुरवठादार कंपनीशी ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यासंदर्भात आवश्यक ते करारनामे करावेत.
पोलीस विभाग, घटना व्यवस्थापक, उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, यांनी लग्न समारंभ, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक, बंदिस्त असो किंवा खुल्या जागेत इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना नियंत्रित करावे. लग्न समारंभात एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. मंगल कार्यालय, लॉन्स, हॉलच्या ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्ती व 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करावी. अंत्यविधीच्या बाबतीत जास्तीत जास्त 20 लोकांसाठी उपस्थितीची मर्यादा असल्याने यापेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कारवाई करावी. दुकान आणि बाजारात मास्क न घालणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्रीमती. खत्री यांनी यावेळी दिलेत.
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी नियोजन करावे. आता 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरणास प्रारंभ झाला असल्याने या वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळा व आश्रमशाळेत तातडीने लसीकरण करून घ्यावे. जेथे अद्यापही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नसेल तेथे त्यांनी तातडीने लस घ्यावी. शाळा व आश्रमशाळेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांचे स्वॅब संकलन करावे यासाठी कॅम्पचे आयोजित करण्यासाठी नियोजन करावे.
‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करावे. नागरिकांनी लग्न, सार्वजनिक ठिकाणी, दुकानांत व रस्त्यावर अनावश्यक गर्दी टाळावी, वारवांर हात धुवावे, मास्क वापरावा आणि सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी यावेळी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

साखरपुडा सोहळ्यातच वृक्षारोपणाचा संदेश, काकर्दे खलाने परिवाराचा उपक्रम

Next Post

युवा महोत्सवात म्हसावद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी होळी लोकनृत्यात नाशिक विभागीय स्तरावर प्रथम

Next Post
युवा महोत्सवात म्हसावद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी होळी लोकनृत्यात नाशिक विभागीय स्तरावर प्रथम

युवा महोत्सवात म्हसावद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी होळी लोकनृत्यात नाशिक विभागीय स्तरावर प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add