नंदूरबार l प्रतिनिधी
कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली योत ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिकाचे आयोजन डॉ . हेडगेवार सेवा समितीतर्फे करण्यात आले होते.

केवळ १० मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी करता येते . या द्वारे एका दिवसात १० एकरवर फवारणी करता येईल . एका एकरसाठी ६०० खर्च येतो . या ड्रोन द्वारे फवारणी यंत्राची किंमत ४ लाख असून भाडे तत्वावर चालविल्यास किफायतशीर ठरू शकते . या तंत्राद्वारे शेतकरी कमी पाण्यात कमी वेळेत फवारणी पूर्ण करू शकतो . या प्रात्यक्षिकाच्या वेळी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांसह परिसरातील शेतकरी , कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ उपस्थित होते
कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार ची १९ वी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक डॉ . हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या बैठकीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे क्षेत्रीय कार्यालय अटारी पुणे येथील संचालक डॉ . लाखनसिंग तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ . शरद गडाख , अटारीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ . राजेश टी . यांची ऑनलाईन उपस्थिती होती . या बैठकीत विभागीय विस्तार केंद्र , धुळेचे प्रमुख डॉ . एम . एस . महाजन , कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे , नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील , लीड बँक मॅनेजर जयंत देशपांडे , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यु.डी पाटील , सहाय्यक आयुक्त , मत्स्यविभाग किरण पाडवी , माविमच्या जिल्हा समन्वयक कांता बनकर , कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकारी मीनाक्षी वळवी , खादी ग्रामोद्योग मंडळाचे करमसिंग वसावे यांची उपस्थिती होती . या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून प्रगतिशील शेतकरी पाटीलभाऊ माळी, स्वप्नील पाटील , अर्चना वळवी उपस्थित होते . या बैठकीत मागील सभेतील निर्णयांचा आढावा कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार यांनी सादर केला . कृषी विज्ञान केंद्र , नंदुरबारच्या पिक उत्पादनशास्त्र , पिक संरक्षण , कृषी अभियांत्रिकी , गृहविज्ञान , कृषी हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी २०२१ चा प्रगती अहवाल तसेच पुढील वर्षाचा कृती आराखडा सादर केला . अटारी पुणेचे संचालक डॉ . लाखन सिंग यांनी कृषी विज्ञान केंद्र , नंदुरबारच्या कामगिरीचे कौतुक करून शेतकर्यांकडे असलेल्या पारंपारिक ज्ञानाचे संकलन करण्याचे सूचित केले . पोषक तृणधान्याच्या लागवडीसोबतच मुल्यवर्धनावर भर द्यावे लागेल . यशस्वी झालेल्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले . महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ . शरद गडाख यांनी शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उत्पादन वाढ करणे , उत्पादन खर्च कमी करणे तसेच मूल्यवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले . राहुरी कृषी विद्यापीठाच्या एकात्मिक शेती पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकर्यांनी करावा असे आवाहन डॉ . शरद गडाख यांनी केले . विभागीय विस्तार केंद्राचे डॉ . एम . एस . महाजन यांनी गावस्तरावर पर्जन्य मापनाची व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करावेत . कुपोषण जास्त असणार्या भागात सुपोषण बाग , पोषक मूल्य जास्त असणार्या पिकांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करावे . सूर्यफूल , भुईमूग या तेलबियांच्या लागवडीच्या वाढीसाठी तसेच सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सुचवले . डॉ . हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील यांनी शेतीसंबधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कृषी विकास जलद गतीने करावा असे आवाहन केले . यावेळी शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीचे सूत्रसंचालन जयंत उत्तरवार यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे यांनी केले . यावेळी प्रयोगशील शेतकरी डॉ . प्रकाश पाटील यांच्या कापूसाच्या यशस्वी प्रयोगाबद्दल सत्कार करण्यात आला . जलवायू समुत्थानशील कृषीतील राष्ट्रीय नवप्रवर्तन ( नीकरा ) प्रकल्पातील प्रयोगशील शेतकरी रमेश जिर्या पावरा यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला . यावेळी केली , उस , पपया , फळपिके सारख्या उंच पिकावर फवारणीसाठी उपयुक्त असणार्या ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते . गरुडा एरोस्पेस प्रा . लिमिटेड , चेन्नई या कंपनीच्या प्रतिनिधींनी ड्रोनची तांत्रिक माहिती दिली . केवळ १० मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी करता येते . या द्वारे एका दिवसात १० एकरवर फवारणी करता येईल . एका एकरसाठी ६०० खर्च येतो . या ड्रोन द्वारे फवारणी यंत्राची किंमत ४ लाख असून भाडे तत्वावर चालविल्यास किफायतशीर ठरू शकते . या तंत्राद्वारे शेतकरी कमी पाण्यात कमी वेळेत फवारणी पूर्ण करू शकतो . या प्रात्यक्षिकाच्या वेळी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांसह परिसरातील शेतकरी , कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ उपस्थित होते.








