Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ड्रोनद्वारे १० मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी, कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले प्रात्यक्षिक

team by team
January 4, 2022
in कृषी
0
ड्रोनद्वारे १० मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी, कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले प्रात्यक्षिक

नंदूरबार l प्रतिनिधी

कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली योत ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिकाचे आयोजन डॉ . हेडगेवार सेवा समितीतर्फे करण्यात आले होते.

केवळ १० मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी करता येते . या द्वारे एका दिवसात १० एकरवर फवारणी करता येईल . एका एकरसाठी ६०० खर्च येतो . या ड्रोन द्वारे फवारणी यंत्राची किंमत ४ लाख असून भाडे तत्वावर चालविल्यास  किफायतशीर ठरू शकते . या तंत्राद्वारे शेतकरी कमी पाण्यात कमी वेळेत फवारणी पूर्ण करू शकतो . या प्रात्यक्षिकाच्या वेळी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांसह परिसरातील शेतकरी , कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ उपस्थित होते
कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार ची १९ वी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक डॉ . हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या बैठकीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे क्षेत्रीय कार्यालय अटारी पुणे येथील संचालक डॉ . लाखनसिंग तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ . शरद गडाख , अटारीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ . राजेश टी . यांची ऑनलाईन उपस्थिती होती . या बैठकीत विभागीय विस्तार केंद्र , धुळेचे प्रमुख डॉ . एम . एस . महाजन , कृषी विकास अधिकारी  प्रदीप लाटे , नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील , लीड बँक मॅनेजर जयंत देशपांडे , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यु.डी पाटील , सहाय्यक आयुक्त , मत्स्यविभाग  किरण पाडवी , माविमच्या जिल्हा समन्वयक कांता बनकर , कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकारी मीनाक्षी वळवी , खादी ग्रामोद्योग मंडळाचे करमसिंग वसावे यांची उपस्थिती होती . या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून प्रगतिशील शेतकरी पाटीलभाऊ माळी,  स्वप्नील पाटील , अर्चना वळवी उपस्थित होते . या बैठकीत मागील सभेतील निर्णयांचा आढावा कृषी विज्ञान केंद्राचे  जयंत उत्तरवार यांनी सादर केला . कृषी विज्ञान केंद्र , नंदुरबारच्या पिक उत्पादनशास्त्र , पिक संरक्षण , कृषी अभियांत्रिकी , गृहविज्ञान , कृषी हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी २०२१ चा प्रगती अहवाल तसेच पुढील वर्षाचा कृती आराखडा सादर केला . अटारी पुणेचे संचालक डॉ . लाखन सिंग यांनी कृषी विज्ञान केंद्र , नंदुरबारच्या कामगिरीचे कौतुक करून शेतकर्‍यांकडे असलेल्या पारंपारिक ज्ञानाचे संकलन करण्याचे सूचित केले . पोषक तृणधान्याच्या लागवडीसोबतच मुल्यवर्धनावर भर द्यावे लागेल . यशस्वी झालेल्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले . महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ . शरद गडाख यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उत्पादन वाढ करणे , उत्पादन खर्च कमी करणे तसेच मूल्यवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले . राहुरी कृषी विद्यापीठाच्या एकात्मिक शेती पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकर्‍यांनी करावा असे आवाहन डॉ . शरद गडाख यांनी केले . विभागीय विस्तार केंद्राचे डॉ . एम . एस . महाजन यांनी गावस्तरावर पर्जन्य मापनाची व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करावेत . कुपोषण जास्त असणार्या भागात सुपोषण बाग , पोषक मूल्य जास्त असणार्या पिकांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करावे . सूर्यफूल , भुईमूग या तेलबियांच्या लागवडीच्या वाढीसाठी तसेच सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सुचवले . डॉ . हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील यांनी शेतीसंबधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कृषी विकास जलद गतीने करावा असे आवाहन केले . यावेळी शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीचे सूत्रसंचालन जयंत उत्तरवार यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ  पद्माकर कुंदे यांनी केले . यावेळी प्रयोगशील शेतकरी डॉ . प्रकाश पाटील यांच्या कापूसाच्या यशस्वी प्रयोगाबद्दल सत्कार करण्यात आला . जलवायू समुत्थानशील कृषीतील राष्ट्रीय नवप्रवर्तन ( नीकरा ) प्रकल्पातील प्रयोगशील शेतकरी रमेश जिर्‍या पावरा यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला . यावेळी केली , उस , पपया , फळपिके सारख्या उंच पिकावर फवारणीसाठी उपयुक्त असणार्‍या ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते . गरुडा एरोस्पेस प्रा . लिमिटेड , चेन्नई या कंपनीच्या प्रतिनिधींनी ड्रोनची तांत्रिक माहिती दिली . केवळ १० मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी करता येते . या द्वारे एका दिवसात १० एकरवर फवारणी करता येईल . एका एकरसाठी ६०० खर्च येतो . या ड्रोन द्वारे फवारणी यंत्राची किंमत ४ लाख असून भाडे तत्वावर चालविल्यास  किफायतशीर ठरू शकते . या तंत्राद्वारे शेतकरी कमी पाण्यात कमी वेळेत फवारणी पूर्ण करू शकतो . या प्रात्यक्षिकाच्या वेळी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांसह परिसरातील शेतकरी , कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री ॲड. के.सी .पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली 8 जानेवारी रोजी नंदूरबार येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक

Next Post

साखरपुडा सोहळ्यातच वृक्षारोपणाचा संदेश, काकर्दे खलाने परिवाराचा उपक्रम

Next Post
साखरपुडा सोहळ्यातच वृक्षारोपणाचा संदेश, काकर्दे खलाने परिवाराचा उपक्रम

साखरपुडा सोहळ्यातच वृक्षारोपणाचा संदेश, काकर्दे खलाने परिवाराचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add