नंदूरबार l प्रतिनिधी
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ येथील शाळेत नववर्षाच्या स्वागत पर्वावर विठ्ठल थगनारे यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाचे स्वागत व 1 जानेवारी रोजी वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.
या दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन अजहर पठाण यांनी केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे भेटकार्ड तयार करून एकमेकांस शुभेच्छा दिल्या व तसेच शाळेतील 18 विद्यार्थ्यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सुंदर असे भेटकार्ड तयार केल्याबद्दल कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल पवार , श्रीमती. उषा मॅडम, मधुकर वळवी, कांतीलाल वसावे, अरविंद सामुद्रे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.








