नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर जनतेसाठीच नव्हे तर पोलीस दलातील अमंलदारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून अत्यंत कमी वेळेत जनतेच्या आणि नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . वर्षानुवर्षे पोलीस दलात परिश्रम करून पोलीस अमंलदार आपल्या पदोन्नतीची वाट पाहत असतात . नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पदोन्नती देणार्या संबंधीत शाखेचे मंत्रालयीन कर्मचार्यांना नंदुरबार जिल्ह्यातील पदोन्नतीस सेवाजेष्ठतेनुसार पात्र असलेल्या सर्व पोलीस अमलदारांना पदोन्नती देणेबाबत सूचना दिलेल्या होत्या , त्याबाबतची सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून नववर्षाच्या पूर्वसंध्येस ३४ पोलीस हवालदारांना सहा . पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली .
नववर्षाच्या बंदोबस्तात सर्व अधिकारी व अमंलदार व्यस्त पोलीस हवालदारांना अचानक संध्याकाळी अशी पदोन्नती झाल्याची बातमी मिळाल्याने पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगुणीत होवून त्यांच्या चेहर्यावर हसू फुलले , नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एकूण ३४ पोलीस हवालदारांना सेवा जेष्ठतेनूसार सहा पोलीस उप निरीक्षक पदोन्नती देऊन नववर्षाची जणू भेटच दिलेली आहे . पोलीस दलात सुमारे ३० ते ३५ वर्ष अथक परिश्रम घेऊन सेवा करणान्या अमंलदारांचा सहा . पोलीस उपनिरीक्षक हा पदोन्नतीचा जवळ – जवळ शेवटचा टप्पा असतो त्यानंतर बहुतेक अमंलदार हे पोलीस दलातुन सेवानिवृत्त होत असतात . पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अमंलदारांना नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पदोन्नती बाबत अभिनंदन करुन नव वर्षाच्या व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . यात पितांबर रतन पाडवी, राजु जयसिंग जाधव,लक्षमण गजमल कोळी, मुंगज्या जत्र्या पाडवी, हर्षल पंडीत रोकडे, विरसिंग बापू वळवी, गिरधन महारु सोनवणे, पानाजी फत्तु बसावे , फुलसिंग मांजच्या पटले, मुकेश राधीया गावीत, मोहनलाल रेवजी वळवी, विठ्ठल पावरा, राजेंद्र शंकर दाभाडे, राजेश सखाराम ठाकरे, राजेंद्र निळकंट चव्हाण, सुपुड़ रुपसिंग पाडवी, गिरधर भिका माळीच , नरेंद्र करणसिंग वळवी, सुकलाल जतन भिल, राजु देविदास पारोळेकर, वंतु भिकान्या गावीत, युवराज पानसिंग रावताळे, फारुकवेग मोगलबेग मिर्झा, गणेश भिकाजी बसावे, कृष्णा पौलाद पवार, वासुदेव प्रतापसिंग वसावे, सादीक शफिक शेख, प्रदीपसिंग देवनाथसिंग राजपुत, संजय भिमराव मराठे, दिपक नामदेव पाटील , संजय चिंधू पाटील, रविंद्र रमेश पवार, विकास पिरन पवार, मुरारजी आलू वळवी यांना पदोन्नती देण्यात आली.नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलीस अधिकारी व अमलदारांचे देखील अडी – अडचणी व समस्या वेळेवर सोडविल्या जातील तसेच गैर कायदेशीर कृत्य करणान्यांची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी यावेळी सांगितले .








