नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात काल तीन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता.आज दि.1 जानेवारी पुन्हा तीन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार तालुक्यात 2 तर नवापूर तालुक्यातील एकाचा असे तिघे काल दि.31 डिसेंबर रोजी कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.आज दि.1 जानेवारीला पुन्हा जिल्ह्यातील तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.आज दि. 1 जानेवारी रोजी नंदुरबार प्रशासनातर्फे 188 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्यात नंदूरबार येथील दोघे तर शहादा येथील एक जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. सध्या नंदूरबार जिल्ह्यात सध्या 9 कोरोना रुग्ण आहेत.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








