नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील समशेरपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत मणिलाल दगडू पाटील यांच्या शेतावर हरभरा पिकावरील घाटेअळी नियंत्रणा बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .
या हरभरा पिकावर घाटेअळी ही मुख्य कीड असून या कीडीमुळे हरभरा पिकाचे ३० ते ४० टक्के नुकसान होते कीडीचे एकात्मीक पध्दतीने नियंत्रण करण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्रॅम ज्वारी शेतामध्ये पेरावी तसेच प्रत्येक २० मीटर अंतरावर पिकाच्या उंचीपेक्षा १ फुट उंच तूर काटक्यांचे, बांबू मचान केल्यास त्यावर पक्षी बसतात व ते अळया वेचून खातात . तसेच घाटे अळीच्या पतंगांना आकर्षित करण्यासाठी हेक्टरी १२ ते १५ कामगंध प्रलोभन सापळे ( फेरोमोन ) बसविल्यास घाटेअळीचे नियंत्रण करणे शक्य असल्याबाबत कृषि सहायक सुनिल पवार यांनी शेतकऱ्यांना सांगून प्रत्यक्ष शेतावर कामगंध प्रलोभन सापळे लावून दाखविले . वरील उपाय योजनां नंतरही घाटे अळीचे नियंत्रण झाले नाही तरच रासायनिक किटक नाशकांचा ( क्लोर अट्रीनिलीप्रोल १८.५ टक्के एस . सी . १०० मी.ली. हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे ) वापर करणे बाबत मंडळ कृषि अधिकारी विजय मोहीते यांनी सांगीतले . या प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी विजय मोहीते, कृषि पर्यवेक्षक करणसिंग गिरासे ,कृषि सहाय्यक हेमंत लाड, प्रगतशिल शेतकरी मणिलाल पाटील , प्रल्हाद पाटील, जयेश पाटील व बाबू भिल, कल्पेश पाटील व शेतकरी उपस्थित होते. सुनिल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले .








