Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ९४ हजार मुलामुलींचे ३ जानेवारीपासून कोविड लसीकरण होणार सुरू

team by team
January 1, 2022
in आरोग्य
0
नंदूरबार जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ९४ हजार मुलामुलींचे ३ जानेवारीपासून  कोविड लसीकरण होणार सुरू

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात दि ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच शाळाबाह्य मुला मुलींसाठी कोविड १९ लसीकरण आयोजन करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यात एकूण ९४ हजार १२९ मुलामुलींना लस देण्यात येणार आहे.यासाठी नंदूरबार तालुक्यात ४, शहाद्यात २, व अक्कलकुवा,तळोदा नवापूर धडगाव येथे प्रत्येकी एक केंद्र असणार आहे.
याबाबत राज्यस्तरावरून एकूण लोकसंखेच्या ४.८७
टक्के उद्दिष्ठ निश्चित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात एकूण ९४ हजार १२९ मुला मुलींना लस देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत १५ ते १८ वयोगटासाठी दि ३ जानेवारी पासून लसीकरण सुरु करण्यात
येणार आहे. सदर लसिकरणात लाभार्थींना COVAXIN लस देण्यात येणार आहे. नंदूरबार जिल्हयात अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे १२ हजार २००, धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात १३ हजार ९८४, तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात ९ हजार ५०४,शहादा तालुक्यात शहरातील नागरी दवाखाना व तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात २३ हजार १९, नवापूर उपजिल्हा रुग्णालयात १५ हजार १४८ तर नंदूरबार तालुक्यात शहरातील जे.पी.एन नागरी दवाखाना, नागरी दवाखाना माळीवाडा, जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार , ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे २० हजार २७३ मुलामुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे.
सदर उद्दिष्ठ प्राप्त करण्यासाठी सुरुवातीस जिल्हास्तर व तालुकास्तरावर कोविड लसीकरण केंद्र उभारून लसीकरण करण्यात येणार आहे. या करीता सर्वेक्षण पूर्ण करून आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण बाबत आदेशित करण्यात आलेले
आहे.
.

बातमी शेअर करा
Previous Post

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, आईसह मुलगा ठार, अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

समशेरपूर येथे हरभरा पिकावरील घाटे अळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next Post
समशेरपूर येथे हरभरा पिकावरील घाटे अळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना  मार्गदर्शन

समशेरपूर येथे हरभरा पिकावरील घाटे अळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add