Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा पोलिस दलातर्फे बॉडी प्रोटेक्टरचे शक्ती प्रदर्शन करीत नंदूरबार शहरातून काढण्यात आले रूट मार्च

team by team
January 1, 2022
in क्राईम
0
जिल्हा पोलिस दलातर्फे  बॉडी प्रोटेक्टरचे शक्ती प्रदर्शन करीत नंदूरबार शहरातून काढण्यात आले रूट मार्च

नंदूरबार l प्रतिनिधी
आंदोलने किंवा अन्य घटनांमध्ये कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दंगलसदृश परिस्थितीत अनेकदा पोलिसांवर दगड भिरकावले जातात. अशा घटनांमध्ये पोलिसांना बचाव करता यावा यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला २५० बॉडी प्रोटेक्टर जाकीट देण्यात आले आहेत. पोलीस दलातर्फे बॉडी प्रोटेक्टर जाकीट घालून नंदूरबार शहरात पथसंचलन केले.

बुलेटप्रूफ जाकोटच्या धर्तीवर नवीन जाकीट तयार करण्यात आले असून बॉडी प्रोटेक्टर जाकिटाचे वजन पाच ते सहा किलोदरम्यान आहे. बऱ्याचदा दंगल भडकल्यास पोलिसांवर जमावाकडून दगडफेक तसेच बाटल्या भिरकावल्या जातात. दगडफेकीच्या घटनांमध्ये हे जाकीट पोलीसांच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे.दरम्यान, काल नंदुरबारात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातून रूट मार्च करण्यात आला. यावेळी पोलीस महासंचालकांकडून मिळालेल्या २५० नवीन सुरक्षा बॉडी प्रोटेक्टर जाकीट घालून पोलीस दलातर्फे संचलन करण्यात आले. नवीन वर्षामध्ये नंदुरबार पोलीस सुरक्षा कवचासह नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणार आहेत, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.सदर जाकिटाचे वैशिष्टय म्हणजे वजनाने अतिशय हलकी आहेत. हे जाकीट परिधान केल्यानंतर पोलिसांचे हात, पाय, छाती, पाठ या अवयवांचे संरक्षण होईल. फायबरपासून हे जाकीट तयार करण्यात आले असून, अंतर्गत भागात स्पंजचा वापर करण्यात आला आहे. शिरस्त्राण आणि जाकीट परिधान केल्यास तणावपूर्ण घटनांना सामोरे जाणाऱ्या पोलिसांना दुखापत होणार नाही.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे गोमांससह पोलिसांनी केली एकाला अटक

Next Post

नवापूर व अक्कलकुवा तालुक्यात बायोडिझेलसह सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नवापूर व अक्कलकुवा तालुक्यात बायोडिझेलसह सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add