नवापूर l प्रतिनिधी
नवापूर महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या मनमर्जीने अधिवेशनात विद्यापीठ विधेयक
पारित करुन घेतल्याच्या विरोधात भाजपा युवा मोर्चातर्फे विधेयकाची प्रत जाळून आंदोलन करुन
विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाचा विरोध दर्शविण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा
प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नवापूर तालुका अध्यक्ष भरत गावीत व
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील यांच्या आदेशानुसार तहसिल कार्यालयाजवळ विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या प्रतींची जाळून होळी करण्यात आली व राज्य शासन निर्णयाचानिषेध करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवामोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी,शहर सरचिटणीस अजय गावीत,जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा कृणाल गावीत,भिमसिंग पाडवी,तालुका सरचिटणीस गोपी सैन,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पवन दाडवेकर,शहर सरचिटणीस कृणाल दुसाने,जिल्हा संयोजक शोशल मिटीया युवा मोर्चा हेमंत शर्मा,सोनु दर्जी,मयुर पाटील,पंकज सुर्यवंशी,गणेश सोनार,प्रशांत पाटील ,मयुर पाटील आदीनी घोषणाबाजी करत राज्यसरकारचा निषेध करण्यात आला.या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचा मार्गदर्शना खाली पो हे का निजाम पाडवी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.








