नंदुरबार | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या हर घर नलसे जल या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे ग्रामीण पाणीपुरवठा कामांना नियोजीत आराखड्यानुसार मंजुरी देण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील ७ गावांना दि. २ व ३ जानेवारी रोजी विषेश ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.यात पुढील ३० वर्षांचा गावातील पाण्याचा आराखडा मंजुर करण्यात येणार आहे.त्यासाठी नागरीकांनी विषेश ग्रामसभेत उपस्थीत राहण्याचे आवाहन खा.डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
केंद्र सरकारच्या हर घर नलसे जल या महत्वज्ञाकांक्षी योजनेची माहिती देण्यासाठी नंदुरबार येथे आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी खा.डॉ. हिना गावित म्हणाल्या कि,जलजिवन मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या हर घर नलसे जल या महत्वाकांक्षी योजना असुन यात शहरी व ग्रामिण भागातील प्रत्येक नागरीकाला दिवसाला ५५ लीटर शुध्द पिण्याचे पाणी पुरवण्याचा मानस आहे.२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत पुढील ३० वर्षांसाठी पाण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.यात लहाण, मोठे गावे,नविन वस्त्या नविन बांधण्यात येणार्या सर्व घरांसाठी पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.हा आराखडा तयार झाल्यास पुन्हा त्यात दुरूस्ती करता येणार नाही.हा आराखडा मंजुरर करून १५ जानेवारी नंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.त्यासाठी नंदुरबार तालुक्यातील गांवाना दि.२ जानेवारी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.यात वाघोदा सकाळी ९ वाजेला, पातोंडा सकाळी १०.३० ला, होळ तर्फे हवेली दुपारी १२ वाजेला,दुधाळे येथे दुपारी २ वाजेला , रनाळे येथे दुपारी ३.३० वाजेला, शनिमांडळ येथे सायंकाळी ५ वाजला तर दि.३ जानेवारी रोजी कोपर्ली येथे सकाळी ९ वाजेला या गावांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी खा. डॉ. हिना विजयकुमार गावित, आ. डॉ. विजयकुमार गावीत व सर्व संबंधित अधिकारी या सभेस आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.
सदरच्या विशेष ग्रामसभेसाठी गावातील सर्व नागरीकांनी उपस्थित राहुन नियोजीत आराखड्यात काही घरे सुटली असतील, पाण्याच्य उद्भव संदर्भात काही म्हणणे असेल किंवा आपणास या संदर्भात काही सुचना करावयाच्या असतील तर त्या सभेत मांडाव्यात.सदरच्या आराखड्याला ग्रामसभेने मान्यता दिल्यानंतर कोणाचेही म्हणणे विचारात घेतले जाणार नाही.आपल्या कुटुंबासह गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्नासाठी ३० वर्षांचा आराखडा तयार करण्यासाठी सर्व नागरीक, ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत उपस्थीत राहण्याचे आवाहन खा.डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत केले.यावेळी आ. डॉ. विजयकुमार गावीत उपस्थीत होते.








