नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूचे प्रकार हा गेल्या काही दिवसांत सर्वत्र वेगाने पसरत आहे .त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात आज दि.३१ डिसेंबर रोजी रात्री पासुन लग्नासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० लोकांसाठी उपस्थित राहण्याची मर्यादेसह अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनिषा खत्री यांनी आदेश दिले.
या आदेशात म्हटले आहे की, कोविड प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत असल्याने महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूचे प्रकार हा गेल्या काही दिवसांत सर्वत्र वेगाने पसरत आहे . तसेच , आगामी सण , लग्नसराई , आणि नववर्ष साजरा करणे यांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात राज्यातून आणखी ओमिक्रॉन कोविड -१९ चे केसेस येण्याची शक्यता आहे . या पार्श्वभूमीवर आता राज्यसरकारकडून कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा , २००५ च्या इतर सर्व सक्षम तरतुदींसह वाचले मधील संदर्भाद्वारे लागू केलेल्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याने यापूर्वी इतर निर्बंध कायम ठेवण्यात येवून नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत नंदुरबार जिल्ह्यात आज दि.३१ डिंसेंबर रोजी रात्रीपासुन अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहे.यात विवाहाच्या बाबतीत , बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मोकळ्या जागेत असो , उपस्थितांची कमाल संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल . कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम , मग तो सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय किंवा धार्मिक असो , बंदिस्त जागेत असो किंवा , खुल्या मोकळ्या जागेत असो , जास्तीत जास्त ५० व्यक्तींची उपस्थिती मर्यादित असेल , अंत्यविधीच्या बाबतीत जास्तीत जास्त २० लोकांसाठी उपस्थित राहण्याची मर्यादा असेल असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनिषा खत्री यांनी दिले आहेत.








