नंदूरबार l प्रतिनिधी
आगामी नववर्षाचे पूर्वसंध्येस देखील दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चार चाकी स्वार आढळून आल्यास त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई करुन लायसन्स निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी दिला आहे.दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवन्यात येत असून १७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 8 वाहन चालकांचे लायसन्स रद्द तर 56 वाहन चालकांचे लायसन्स निलंबीत करण्याचा प्रस्ताव पटविण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुध्द वेळोवेळी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते . नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत चारचाकी व दुचाकी मोटार सायकल चालकांची तपासणी केली असता काही वाहन चालकांनी मद्यपान केलेले आढळून आले . त्यामुळे त्यांचे विरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले . त्यामध्ये प्रामुख्याने नंदुरबार शहर- 21. उपनगर 5 , नंदुरबार तालुका 10. विसरवाडी 28 , नवापुर 24 , शहादा 10 सारंगखेडा – 6 , म्हसावद 6 , धडगाव -10 . अक्कलकुवा 9 , तळोदा 8 मोलगी v7 , शहर वाहतुक शाखा -26 असे एकुण 170 गुन्हे मद्यपी चालकांवर नोंदविण्यात आले . त्यातील 8 वाहन चालकांचे लायसन्स यापुर्वी 3 महिने व 6 महिन्यासाठी निलंबीत करण्यात आले होते , दि. 30 डिसेंबर रोजी यातील उर्वरीत 30 वाहन चालकांचे लायसन्स निलंबन प्रस्ताव तसेच रस्ते अपघातातील पादचारी , दुचाकी वाहन चालक व इतर अपघातांच्या 134 गुन्ह्यातील अपघात करुन पळुन गेलेल्या वाहन चालकांचा शोध घेवुन 26 वाहन चालकांचे लायसन्स निलंबन प्रस्ताव असे एकुण 56 वाहन चालकांचे लायसन्स निलंबीत करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशीक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले आहेत . तसेच भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे . नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की , दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये , दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकेदायक आहे , नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पालन करावे . तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये . असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे.








