नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात शहादा येथे काल दि.२९ डिसेंबर रोजी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता.आज दि.३० डिसेंबर रोजी नंदूरबार शहरात एक कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
आज दि. ३० डिसेंबर रोजी नंदुरबार प्रशासनातर्फे ९४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्याचा अहवाल आज प्राप्त झाला.यात नंदूरबार शहरातील राज सिटी येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.कालच शहादा शहरातील अयोध्या नगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. सध्या नंदूरबार तालुक्यात ४,तळोदा व शहादा येथील प्रत्येकी एक असे जिल्ह्यात ६ कोरोना रुग्ण आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








