धडगाव | प्रतिनिधी
धडगाव,अक्कलकुवा,मोलगी,खापर ह्या केंद्रावरिल होणार्या परीक्षांना पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाइन परीक्षासहित ऑफलाईन परीक्षा घेण्यासही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अक्राणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र दिलीप ढोले यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू यांचा कडे केली आहे
धडगाव,अक्कलकुवा,मोलगी,खापर या चार परीक्षा केंद्रावर बी.कॉम,बी.एससी.एम.ए या वर्गाचा नियमित परीक्षा दि.५ जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहेत या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत परंतु धडगाव,अक्कलकुवा,खापर, मोलगी हे चारही परीक्षा केंद्र व विद्यार्थी सुद्धा अतिदुर्गम भागात व डोंगराळ परिसरात असल्याने येथील कुठलीही नेटवर्क सुविधा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्यास अनेक अडचणी येतात या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते तसेच धडगाव,अक्कलकुवा,मोलगी व खापर ह्या भागातील अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे व १०० टक्के विद्यार्थ्यांचे परिवार शेती व्यवसायावर अवलंबून असल्याने मोबाईल सारखी महागडी वस्तू घेणे सुद्धा कठीण बाब आहे.हीच बाब लक्षात घेता धडगाव,अक्कलकुवा,मोलगी,खापर ह्या केंद्रावरिल होणार्या परीक्षांना पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाइन परीक्षासहित ऑफलाईन परीक्षा घेण्यासही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अक्राणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र दिलीप ढोले यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू यांचा कडे केली आहे तसेच निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अँड. के.सी.पाडवी यांना माहितीत्सव रवाना केली आहे.