नंदूरबार l प्रतिनिधी
खान्देश अहिराणी कस्तुरी मंचतर्फे नंदुरबार तालुक्यातील तिशी येथील सुपुत्र गोकुळ यशवंत पाटील यांना खान्देश भुषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खान्देश अहिराणी कस्तुरी मंच (पुणे), महाराष्ट्रतर्फे अमळनेर येथे संपन्न झालेल्या 2 दिवसीय साहित्य संमेलनात हास्य कलाकार श्याम राजपुत, अहिराणी भाषेच्या अभ्यासिका डॉ. उषा सावंत, अहिराणी कस्तुरी मंचच्या अध्यक्षा विजयाताई मानमोडे या मान्यवरांच्या हस्ते “खान्देश भुषण” पुरस्कार नंदुरबार तालुक्यातील तिशी भालेर येथील सुपुत्र गोकुळ यशवंत पाटील यांना देण्यात आला.
गोकुळ पाटील यांचे पूर्ण शिक्षण भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व नंदुरबार येथे झाले आहे ते झनकार बिट्स ऑर्केस्ट्रा नाशिक यांचे संचालक आहेत .गोकुळ पाटील यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.








