म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील खेड दिगर येथील मुख्य राज्य मार्गाला लागून असलेल्या बाबा लॉजिंग या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक सरळ इमारतीत शिरला.यातकॉम्प्लेक्समधील पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले. मात्र मात्र सुदैवाने तेथे कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही.
महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्याच्या सीमेवरील खेड दिगर येथील मुख्य रस्त्याला लागून च बाबा लॉज व कॉम्प्लेक्स आहे.दि.२७ च्या दिवसा दुपारी २ वाजेच्या दरम्यान आयशर ट्रक (क्रमांक एम. एच. १८, ५६६०) हा भरघाव वेगाने जात होता यावेळी ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक सरळ लोजिंग कॉम्प्लेक्स इमारतीत शिरला ट्रक इमारतीच्या कॉम्प्लेक्स मध्ये शिरत असल्याचे तेथील काही दुकानदाराच्या लक्षात येताच दुकानदार व ग्राहक यांच्या जिवाच्या आकांताने एकच धावपळ उडाली व आरडाओरड सुरू केली. तेव्हा चालकाने ब्रेक लावला मात्र तोपर्यंत ट्रक इमारतीच्या पुढील पत्र्याच्या शेडमध्ये शिरला होता त्यामुळे शेडचे नुकसान झाले होते इमारती जवळ उभी असलेली कार (क्र.एम.पी.४६ सी ४१७१)लाही फरफटत नेल्याने कार चे नुकसान झाले आहे. ट्रक म्हध्ये कापूस भरलेला होता सुदैवानं आग न लागल्याने मोठा अनर्थ टळला हा कापूस जवळचा असलेला एका जिनिंग प्रेसिंग मिलमध्ये जात असल्याने समजते तसेच कॉम्प्लेक्स मधील नागरिक वेळीच बाहेर पळाले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी स्थानिक पोलीस स्टेशन दाखल होऊन रात्री उशिरापर्यंत कारवाई कामकाज सुरू होते.








