Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे हुतात्मा शिरीषकुमार जयंतीनिमित्त अभिवादन

team by team
December 29, 2021
in राज्य
0
नंदूरबार येथे हुतात्मा शिरीषकुमार जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार l प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व काळात नंदुरबार शहरात जुलमी ब्रिटिश शासनाची लढा देऊन शहीद झालेले हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले. शहरातील बालवीर चौक, नवा भोई वाडा परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.

याप्रसंगी सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक यांच्या हस्ते शिरीष कुमार मेहता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नंदुरबार तालुका सचिव डॉ. गणेश ढोले यांनी पुष्पार्पण केले. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, बालवीर शिरीषकुमार मेहता यांचा जन्म 28 डिसेंबर 1926 रोजी नंदनगरीत झाला. शालेय जीवनात देशप्रेमाची ओढ असल्याने इंग्रजांना चले जावचा इशारा देत 9 सप्टेंबर 1942 रोजी बाल सवंगड्यांसोबत शहीद झाले. त्यानंतर नंदुरबारचे नाव देशात अजरामर झाले.जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमास महादू हिरणवाळे, प्रफुल्ल राजपूत, दिलीप कुंभार, अरविंद खेडकर, प्रा. एकनाथ हिरणवाळे, तेजस घटी, विशाल हिरणवाळे तसेच शालेय विद्यार्थी दिव्या गवळी, भूमी गवळी, ज्योती गवळी, धिरेन  हिरणवाळे, कृष्णा गवळी, प्रणव गवळी, राज घुगरे, आदित्य गवळी, वेदांत गवळी, कृष्णा चौधरी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. 2 जानेवारी रोजी होणारी परीक्षा रद्द

Next Post

भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक घुसला थेट शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये

Next Post
भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक घुसला थेट शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये

भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक घुसला थेट शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add