नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा नगरपरिषदेची दि.२९ डिसेंबर रोजी मुदत संपत असल्याने उपविभागीय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेत.
संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कोविड -१ ९ च्या राज्यात झालेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने या अनुषंगाने मुदत समाप्तीनंतर संबंधित नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदी व विशेषतः संदर्भ क्र . १ अन्वये अंतर्भुत केलेल्या कलम ३१७ ( ३ ) मधील तरतुदीनुसार उपविभागीय अधिकारी , तहसिलदार व मुख्याधिकारी यांची आपल्या विभागातील संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या प्रशासक पदी नियुक्ती करण्यात येत आहे .
त्या अनुषंगाने शहादा नगरपरिषदेची दि.२९ डिसेंबर २०२१ रोजी मुदत संपत असल्याने शहाद्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेत.मुदत संपताच प्रशासक कार्यभार स्वीकारणार आहेत.








