नंदूरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांना राजधानी दिल्ली येथे नॅशनल हुमन राईट ऑर्गानायझेशन कडून इंडियन आयकॉन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा तालूक्यातील ‘बालाघाट’ या अतिशय दुर्गम लहान खेड्यातील आदिवासी समाजातील पहिला नवयुवक अनिल वसावे यांने कोरोना काळानंतर युरोपातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एलब्रूस’ सर करून विश्वविक्रम केला होता. कोरोना काळात जगात सुरू झालेल्या पर्वत आरोहण मोहिमेतील अनिल वसावे हा भारतातून गेलेल्या गिर्यारोहकांमधून पहिला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी ठरला होता.
अनिल वसावे यांनी 2021 मध्ये केलेली ही दुसरी आंतरराष्ट्रीय मोहीम होती. 26 जानेवारी 2021 रोजी ही अनिल वसावे याने आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे शिखर सर केले होते. आता 8 जुलै,2021 मध्ये एकाच वर्षी 2 आंतरराष्ट्रीय मोहिमा अंमलात आणताना युरोपातील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या टीम चे नेतृत्व ही करायला मिळणे ही खरी तर प्रचंड अभिमानाची गोष्ट होती. याची दखल घेत नॅशनल हुमन राईट ऑर्गानायझेशन कडून दिल्लीतील लीला ॲम्बियन्स हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांचा मान्यवरांच्या हस्ते इंडियन 27 डिसेंबर रोजी आयकॉन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.यावेळी जलशक्ती प्रोत्साहन कॅबिनेट मंत्री गजेंद्र शेखावत, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय वन, पर्यावरण, युवा क्रीडा मंत्री मामा नटुग आदी मान्यवर उपस्थित होते.येणाऱ्या काळात 7 ही खंडातील 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा मानस आहे, असे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी सांगितले.