Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरची खरेदीने ओलांडला सव्वा लाख क्विंटलचा टप्पा

team by team
December 28, 2021
in कृषी
0
नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरची खरेदीने ओलांडला सव्वा लाख क्विंटलचा टप्पा

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरची खरेदीने सव्वा लाख क्विंटल चा टप्पा ओलांडला आहे.यंदा अडीच ते तीन लाख क्विंटल आवक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मिरचीला सध्या अठराशे ते चार हजार पर्यंत दर असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात ओल्या लाल मिरची खरेदीसाठी अव्वल मानल्या जाणाऱ्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा डिसेंबर अखेर १ लाख २५ हजार क्विंटल पेक्षा अधिक मिरची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे ही मिरची पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले उत्पादन व दर मिळत आहे. मार्च अखेरपर्यंत सुरू राहणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अडीच ते तीन लाख क्विंटल आवक होण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा, नंदुरबार या तीन तालुक्यांमध्ये प्रामुख्याने मिरची पिकाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या खरीप हंगामात जवळपास ३ हजार ५२३ हेक्‍टरवर मिरची पिकाची लागवड केली गेली होती. जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाले असले तरी शेतकऱ्यांच्या मेहनतीने मिरची पिकात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी लगबग आहे. दोन वेळा अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे, तसेच दरवर्षी प्रमाणे मिरची पिकावर येणाऱ्या रोगांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक बोजा असल्याने सध्या मिळणार्‍या दरांपेक्षा आणखी चांगले दर मिळावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षी पूर्ण हंगामात ८० हजार क्विंटलची आवक झाली होती. यंदा डिसेंबर अखेर पर्यंत दुप्पट मिरचीची आवक झाली आहे. मिरची खरेदी विक्रीतून कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळत आहे. बाजार समितीत सुरुवातीला दर कमी होते, परंतु आता कमीत कमी अठराशे पासून ते ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिरचीच्या दर्जानुसार शेतकऱ्यांना भाव मिळत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ओल्या लाल मिरचीला चांगले दर मिळत आहे, दररोज दोनशे ते अडीचशे वाहनांमधून विक्रीसाठी मिरची बाजार समितीत येत असल्याने आवक मध्ये वाढ झाली आहे. मार्चअखेरपर्यंत अडीच ते तीन लाख क्विंटल आवक येण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातूनही मिरची उत्पादक शेतकरी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत असल्याने यंदा मिरची आवक मध्ये वाढ झाली आहे. आंध्रप्रदेश राज्यातील गुंटूर येथील मिरची खरेदी चे भाव पाहता नंदुरबार येथे शेतकऱ्यांना मिळणारा भाव कमी असल्याने व्यापाऱ्यांनी आणखी चांगले दर मिरची उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते शहादा तालुका दूध संघाचे फलक अनावरण

Next Post

गल्ली ते दिल्ली प्रवास : दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे इंडियन आयकॉन अवॉर्डने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add