नवापूर l प्रतिनिधी
नवापुर भाजपातर्फे स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरा करीत सुशासन दिनानिमित्त भाजपाचे ज्येष्ठ ,श्रेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सन्मानित करण्यात आले.
नवापुर शहरातील सराफगल्ली येथे भारताचे पुर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने भाजपा व युवा मोर्च तर्फे प्रतिमा पूजन करून त्यांना आदराजंली अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. तसेच नवापुर भाजपापक्ष वाढीसाठी , पक्षाचा कठीण समयी, पक्ष संघटनेसाठी पक्षात राहुन पक्ष टिकवुन पक्षाची विचारधारा समाजापर्यंत पोहचवली.अशा पक्षाचे जुने, ज्येष्ठ, श्रेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सुशासन दिना निमित्त नवापुर भाजपा तालुक्याचे अध्यक्ष तथा जि.प.सदस्य भरत गावित यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, जिल्हा सरचिटणीस राजु गावित यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल दुसाने यांनी केले तर शहराध्यक्ष प्रणव सोनार यांनी आभार व्यक्त केले.याकार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजू गावित, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, शहराध्यक्ष प्रणव सोनार, नगरसेवक महेंद्र दुसाणे, तालुका उपाध्यक्ष रमेश राणा, सुनिताताई वसावे, दुर्गाताई वसावे, घनश्याम परमार, कमलेश छत्रीवाला,बाबा वाणी, रामभाई बरेजा, अविनाश हिंगु, अजय गावित, निलेश प्रजापती, जाकीर पठाण,कुणाल दुसाने, गोपी सैन, हेमंत शर्मा,तोसिफ मन्सूरी,सौरव भामरे,जहूर पठाण,पवन दांडवेकर, वेलजीभाई वसावे, धनंजय वसावे, किरण त्रिवेदी,शैलेश गावित आदी उपस्थित होते.








