Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिनोदा येथे लुपिन फाऊंडेशनतर्फे शेतकरी दिवस साजरा 

team by team
December 26, 2021
in कृषी
0
चिनोदा येथे लुपिन फाऊंडेशनतर्फे शेतकरी दिवस साजरा 

तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे लुपिन ह्युमन वेलफेअर अ‍ॅण्ड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला लुपिन ह्युमन वेलफेअर अ‍ॅण्ड रिसर्च फाउंडेशनचे सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल सैंदाणे, प्रकल्प समन्वयक दिपक जाधव, पि.यू.व्यवस्थापक किरण पाटील, तालुका समन्वयक अभंग जाधव, रांझणी कृषि विद्यालयाचे कर्मचारी दिपक मराठे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिमित्र करमसिंग पावरा यांनी केले.
यावेळी रांझणी कृषि विद्यालयाचे दिपक मराठे यांनी राष्ट्रीय शेतकरी दिवस याविषयी बोलतांना सांगितले की, देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग हे स्वतः शेतकरी कुटुंबातील होते. शेतकऱ्यांचे नेते मानले जाणारे चौधरी चरण सिंग यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी झाला. २३ डिसेंबरला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी दिन साजरा केला जातो. ते स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगली जाण होती. त्यामुळे त्यांनी शेतकर्‍यांसाठी भरीव कामगिरी केली. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चौधरी चरणसिंग हे फार कमी काळ पंतप्रधान असतानाही त्यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या या योगदानाबद्दल सन २००१ मध्ये सरकारने चौधरी चरणसिंग यांचा वाढदिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून राष्ट्रीय शेतकरी दिन हा २३ डिसेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो असे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच लुपिन फाऊंडेशनचे पि.यू.व्यवस्थापक किरण पाटील यांनी लुपिन फाऊंडेशन मार्फत शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शेतीविषयक योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर चिनोदा येथील शेतकरी सुनिल पवार यांनी देखील शेतकरी दिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लुपिन फाऊंडेशनचे कृषिमित्र करमसिंग पावरा, दिपक ब्राह्मणे, प्रतापसिंग वसावे, दिपाजंली पावरा आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला चिनोदा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन दिपाजंली पावरा यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांतर्फे पपई लागवड बंद करण्याचा निर्णय

Next Post

नवापुर भाजपातर्फे सुशासन दिनानिमित्त ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्या हस्ते सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add