तळोदा l प्रतिनिधी
बोरद येथील एस.व्ही.पी.एफ.ग्रुप तसेच बोरद परिसरात पपई उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोरद येथे नुकतीच घेण्यात आली . या बैठकीत पपई व्यापारी यांच्या बाबत चर्चा करण्यात आली.काही व्यापारी आपापल्या संगनमतातून शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून व्यवस्थित भाव देत नाहीत आपली मनमानी करतात .त्याचबरोबर घेतलेल्या मालाचे पैसे ही शेतकऱ्यांना वेळेवर देत नाहीत यामुळे शेतकरी अडचणीत येतो.
वास्तविकत: पपई लागवडीबाबत आर्थिक बाबीचा विचार केला तर पपई चे एक रोप साधारणपणे १५ ते २० रुपयांपर्यंत उपलब्ध होते या रोपाला पाण्यापासून विविध खते तसेच फवारणी करण्यापर्यंत खर्चाची आखणी पाहिली तर एका झाडाला सक्षम करेपर्यंत १०० तर १५० रुपयांपर्यंत खर्च येत असतो आणि हे पीक सांभाळणे खूप कठीण जातं त्याला थंडी ते उन्हापासून बचाव करण्यासाठी जाळीचे आवरण बांधावे लागते.त्याचबरोबर फळ परिपक्व झाल्यावर व्यापारी वेळेवर आला तर ठीक नाहीतर फळ खराब होण्याचा धोका असतो अशाही परिस्थितीत शेतकरी आपले पीक जोपासतो त्याला फक्त उत्पादन आणि भावाची अपेक्षा असते पण खरेदीदार व्यापाऱ्यांचा गट असल्याने ठराविक व्यापारी हा माल खरेदी करीत असतात त्या मुळे ते देतील तोच भाव शेतकऱ्यांना बंधनकारक होतो नाही माळ विकला तर तो सोडण्याचा धोका असतो त्यामुळे शेतकऱ्यांकडे पर्याय नसतो आणि याचाच फायदा हे व्यापारी उचलतात आणि कमी भाव देऊन माल खरेदी करतात मग तो शेतकऱ्यांना परवडो अथवा न परवडो .त्यामुळे व्यापाऱ्यांच्या जाचाला कंटाळून बोरद त्या बरोबर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नुकताच एक ठराव आपल्या बैठकी पारित करून घेतला की पुढील वर्षांपासून पपईची १०० टक्के लागवड बंद करणे.या ठरावावर एकूण १०० ते ११० पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








