नंदुरबार l प्रतिनिधी
नाताळ सण हा ख्रिस्ती बांधवांच्या मोठा सण आहे.प्रभू येशूचा जन्मदिन म्हणून हा सण पाळला जातो.त्या निमित्त नंदूरबार शहरातील मिशन कंपाउंडमध्ये असलेल्या फ्रेंक्लिन चर्च मध्ये सामूहिक प्रार्थनेच्या कार्यक्रम धर्मगुरू अनुपकुमार वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

एस.ए.मिशन कंपाउंड मधील असलेल्या फ्रेंक्लिन चर्च मध्ये नाताळनिमित्त सकाळी आठ वाजेपासून तीन टप्प्यात कार्यक्रम घेण्यात आला कोरोना आजारामुळे शासनाने दिलेल्या निर्बंधांचे पालन करण्यात आले अनुपकुमार वळवी यांनी नाताळ सणाची माहिती सांगितली तसेच प्रार्थना केली यावेळी ग्लडविन जयकर, जे एच पठारे यांनी संदेश दिले.
यावेळी खा. डॉ.हिना गावित यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ राजेश वळवी ,नूतनवर्षा वळवी, मंडळीचे पुढारी पंचमंडळ चर्चचे सदस्य वेगवेगळ्या तीन ग्रुप मध्ये उपस्थित होते. प्रवचनाच्या नागरिकांनी लाभ घेतला यावेळी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील शुभेच्छा दिल्या.








