नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा पो.पिंपळोद ता. जि. नंदूरबार शाळेत “पूज्य साने गुरुजी” यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जी.टी.पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ.माधव कदम हे होते.कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. त्यानंतर अध्यक्ष,प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापक हस्ते पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत भाषणातून व्यक्त केले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जी.टी. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. माधव कदम सर यांनी सानेगुरुजी रचित “श्यामची आई” या पुस्तकातील साने गुरुजींचे बालपणातले प्रसंग हास्य व करुणामय भावात विद्यार्थ्यांसमोर कथाकथन माध्यमातून मांडले सुरुवातीला सगळ्या विद्यार्थ्यांना खदाखदा हसवले व नंतर मात्र सर्वांच्या डोळ्यातून अश्रु बरसले. श्यामची आई मांडत असताना प्रत्येकाला आपल्या आईची आठवण ही मात्र येत होती त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून केंद्रप्रमुख बापूसाहेब हिरामण वाघ यांनी विद्यार्थ्यांना श्यामचे म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांचे विचार,जिद्द,चिकाटी आपल्या शैक्षणिक जीवनात कसे उतरवता येईल याविषयीचे मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रमात शाळेचे उपशिक्षक दिपक वळवी,रामानंद बागले हरुणखा शिकलीकर, संजय बोरसे,श्रीमती. अरुंधती शिंदे,श्रीमती संगिता गोखले तसेच जि.प.मराठी शाळेचे मुख्याध्यापक मनोज चौधरी उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या क.लिपिक श्रीमती नेहा शर्मा यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय वसावे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाची सांगता *”वंदे मातरम्* या गीताने करण्यात आली.








