नंदूरबार l प्रतिनिधी
आतापर्यंत आपण आमदार आपल्या दारी उपक्रमा बद्दल ऐकले आहे.मात्र तळोदा तालुक्यात विधवा, वृद्ध व अपंग आदी योजनाच्या लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी संजय गांधी निराधार योजना समितीचा अध्यक्ष “आपल्या दारी “उपक्रम राबवित
कु.निशा पद्माकर वळवी यांच्या प्रमुख उपस्थिती दुसऱ्या टप्प्याचे घरपोच मंजुरी पत्र वाटप करण्यात येत आहे.
तळोदा तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याना दुसऱ्या टप्प्याचे घरपोच मंजुरी पत्र वाटप करण्यात येत आहे.
जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांची लहान बघिनी तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांच्या कनिष्ठ कन्या तथा संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य कु.निशाताई पद्माकर वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत, समिती अध्यक्ष-प्रविण वळवी व सदस्य धर्मेंद्र वळवी यांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून तळोदा तालुक्यात विधवा, वृद्ध व अपंग आदी योजनाच्या लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी. यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांची संकल्पना व मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थ्याना मंजुरी पत्र घरपोच मिळावे यासाठी ” अध्यक्ष आपल्या दारी ” उपक्रम राबविण्यात येत आहे. नुकतेच दि.20 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रविण वळवी (रंजनपूर/मोरवड).यांच्या हस्ते घरपोच मंजुरी पत्र वाटपाची सुरुवात करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात नवागांव, प्रतापुर,राणीपुर, पाडळपुर, जामोनीपाडा, धनपूर, छोटा धनपूर व मोहिदा आदी गावात संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थ्याना मंजुरी पत्र घरपोच देण्यात आले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दिपक मोरे उपसभापती, सचिन ठाकरे दारासिंग ठाकरे, प्रताप ठाकरे, अशोक पाडवी , राहुल पावरा, दिलवर वसावे, भरत ठाकरे शंकर ठाकरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्याना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. यावेळी “अध्यक्ष आपल्या दरी ” राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे लाभार्थी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.








