नंदुरबार | प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय मायोका अर्थात महाराष्ट्र युथ कॉर्निवल चे आयोजन करण्यात आले आहे.यात विविध सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन विजेत्यांना २५ लाखांचे बक्षीस वाटप करण्यात येणार आहे.यायाठी नंदुरबार येथे दि. ७ जानेवारी २०२२ रोजी न ऑडीशन होणार आहे .
या उपक्रमाची माहिती देतांना राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ . अभिजीत मोरे यांनी सांगितले आहे की , ग्रामीण भागातील युवक – युवती विद्यार्थी यांना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना योग्य असे हक्काचे व्यासपिठ या स्पर्धेव्दारे उपलब्ध होणार असुन त्यांचे एकुण रोख बक्षीस रक्कम रुपये २५ लाख इतके ठेवण्यात आले आहे . यामध्ये नृत्य , गायन , मॉडेलिंग , चित्रकला या स्पर्धेचा समावेश असुन दि . २७ डिसेंबर २०२१ पर्यंत तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन आपले नाव नोंदवु शकतात . ऑनलाईन नांव नोंदणीसाठी
www.nscmayoca.com या संकेतस्थळावर करु शकतात व ऑफलाईनसाठीफॉर्म साठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष नंदुरबार बबलु कदमबांडे यांच्याशी ९६३७००६६०६, ९३७१८६८९०६ संपर्क करुन व राष्ट्रवादी जिल्हा पक्ष कार्यालय , गिरिविहार गेट जवळ , नंदुरबार येथे ही फॉर्म उपलब्ध असुन आपला प्रवेश निश्चित करू शकतात . तरी नंदुरबार जिल्हयातील इच्छीत असनार्या सर्व युवक,युवतींनी,विद्यार्थ्यांनी दि. ७ जानेवारी २०२२ रोजी नंदुरबार येथे ऑडीशन होणार आहे . तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ . अभिजीत मोरे व व्यापार उदयोग सेल जिल्हाध्यक्ष युवा नेते ॲड . राऊ मोरे व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु कदमबांडे यांनी केले आहे .








