नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राहुल गांधी यांचा वाढदिवस हा संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल, डिझेल, गॅस यांची वाढती महागाई ही जनतेला खिशाला न परवडणारी आहे. यावेळी नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी सांगितले, जनतेची सर्रास लूट केंद्रातील मोदी सरकार करीत आहे. डिझेल, पेट्रोल यांची भाववाढ ही गगनाला भिडलेली आहे. दैनंदिन उपयोगात येणारे सर्व वस्तूंचे भाव हे वाढवले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या कारकीर्दीत ३८५ रुपयाला गॅस सिलेंडर मिळत होते ते आज ९८५ रुपयांना मिळत आहे. सामान्य व मध्यमवर्गीय माणसाला जगणे अतिशय कठीण झाले आहे. या देशात संपूर्ण अराजकता माजली आहे. केंद्रातील मोदी सरकार जे जे निर्णय घेत आहेत ते आज मध्यमवर्गीय मागासवर्गीय आदिवासी दलित यांच्याविरोधात आहेत. म्हणून राहुल गांधी यांच्या वाढदिवशी संपूर्ण देशातील जनता ही केंद्रातील भाजपा सरकारचा जाहीर निषेध करीत आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरीब जनतेला, रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत. यावेळी कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, पंडितराव पवार, इक्बाल खाटीक, अशोक पाटील, रवींद्र कोठारी, शांतीलाल पाटील, राजेंद्र पाटील, भास्कर पाटील, स्वरूप बोरसे, एजाज बागवान, साजिद भाई, रहुफ शहा, नरेश पवार, हाजी युनिस, देवाजी चौधरी, खंडेराव पवार, राहुल पाटील, दिलावर शहा आदी उपस्थित होते.