नंदूरबार l प्रतिनिधी
कर्नाटक येथे ऊसतोड कामानिमित्त घेऊन गेलेल्या कामगारांची सुटका व्हावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे
पोलीस अधीक्षक यांना नंदुरबार युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी दिले.
नंदुरबार जिल्ह्यातील तऱ्हावद येथील सुनील बिज्या पाडवी, सविता सुनील पाडवी, योगेश बिज्या पाडवी, मालती योगेश पाडवी, कविता पाडवी, मोगरा विरजी तडवी, विलास विरजी तडवी,रीना विलास वळवी या १६ मजुरांना बीड येथील हरीश मानिकराव कसबे मु. पोस्ट धारूर ता.जिल्हा बीड हा मुकादम जालना येथे ऊस तोड कामासाठी चला असे सांगून घेऊन गेला व वीस दिवस जालना येथे डांबून ठेवले त्यानंतर १६ मजुरांना हरीश माणिकराव कसबे व त्यांचे तीन साथीदार गंगाराम केरबा वाघमारे पोस्ट सिरसवाडी ता. घनसावंगी जि. जालना विकास थोरात पोस्ट माया वाडी ता. सुलतानपूर जि. बीड, नावडकर दिगंबर पोस्ट मायावाडी ता. सुलतानपूर जि. बीड यांनी या मजुरांना जालना येथून परस्पर कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील बागेवाडी येथील विश्वराज इंडस्ट्रीज साखर कारखाना येथे ऊसतोड कामगार म्हणून कामासाठी घेऊन गेले. व दमदाटी करून काम करून घेत आहेत व रात्री दारू पिऊन मुलींची नावे घेतात आणि शिवीगाळ करून छेड काढतात व एका मुकादमाच्या पैशावर ४ मुकादम काम करून घेतात व आतापर्यंत सदर १६ मजुरांकडून एकूण ३ लाखाचे काम झाल्यावर सुद्धा त्यांना आजपावेतो फक्त २ लाख ४० हजार रुपये दिले आहे .त्यांच्या नातलगांना त्यांच्याशी संपर्क करू देत नाही. त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेतले व सदर १६ मजुरांची नातलग प्रकाश भिका कापुरे राहणार बोरद ता. तळोदा जि. नंदुरबार हे त्यांच्या नातेवाईकांना सदर इसमांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांच्याकडून ५ लाखाची मागणी केली व त्यांना सोडविण्यास गेलेल्या कापुरे यांना १ महिन्यापर्यंत कारखान्यात कपडे काढून कोंडून ठेवून मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड व रोकड पैसे हिसकावून घेतले तर नंतर कापुरे हे कसे तरी दरवाज्याचा लॉक तोडून बाहेर पडले व नंदुरबार गाठले तरी सदर आडदांड वृत्तीच्या हरीश मानिकराव कसबे, गंगाराम केरबा वाघमारे, व विकास थोरात, नावडकर दिगंबर यांच्याकडून उपरोक्त १६ मजुरांची सुटका व्हावी यासंदर्भात निवेदन पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यामार्फत नंदुरबार युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी दिले आहे. सदर निवेदन देताना बोरद येथील भिकलाल ढोडरे रिपब्लिकन पार्टीचे तळोदा तालुका अध्यक्ष तसेच प्रकाश भिका कपूर हेही हजर होते.








